कामोठे (4K News) – नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या काही बनावट व्यक्ती स्वतःला महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा रेशन दुकानदार असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे फसवे लोक विविध बहाण्यांनी नागरिकांना गोंधळात टाकून […]
सारडे गावातील महिलेचा सर्प दंशा ने मृत्यू
नागरिकांनी,शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे सर्प मित्रांचे आवाहन उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (वय ७७ ) हिला सर्प दंश झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता तीचा रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ( दि ४) घडली . त्यामुळे नागरिकांनी अशा सर्प दंशाच्या घटनापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण […]
जनजागृतीचा अभाव असल्याचे सांगत संतोष काटे यांनी केली खंत व्यक्त.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उलवे शहरातील व आजू बाजूच्या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदार जागृतीची तीव्र गरज भासत आहे. काही भागांमध्ये खऱ्या मतदाराला मतदान करता न आल्याच्या तक्रारी सतत पुढे येत असून, अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे.उलवे शहरात व आजूबाजूच्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्याची गरज निर्माण […]
वीर वाजेकर महाविद्यालयातर्फे पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण संपन्न.
उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) वतीने उरण तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. “प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा” (Beat Plastic Pollution) या २०२५ च्या जागतिक पर्यावरण दिनाच्या घोषवाक्याला […]
पंचायत समितीच्या माध्यमातून पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उरण पंचायत समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जितेंद्र चिर्लेकर- प्रशासन अधिकारी , संपदा कटोर राकेश पाटील , सुजन पाटील , डॉ.भोजने , उल्हास पाटील , तेजस जोशी , मीनल मगर आदी […]
उरण नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद उरण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या माध्यमातून उरण मध्ये पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उरण नगरपरिषदेच्या कार्यालयात विविध शाळा कॉलेजमधील विद्यार्थी,नागरिक, सफाई कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत पर्यावरण संरक्षण व प्लास्टिकचे वापर टाळणे या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी सर्वप्रथम उरण नगरपरिषदेचे अधिकारी […]
खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना उरणमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रांनांनी समनव्य साधून पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत. नालेसफाईला गती द्यावी. उरण शहरात समुद्राचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. जेथे पाणी येते, त्याठिकाणी भराव टाकावा. झाडांची छाटणी करावी. खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात कोठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मावळचे खासदार […]
माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी २५ दिव्यांगाना दिला मदतीचा हात.
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील दिव्यांग मित्र म्हणून सुप्रसिद्ध असणारे सर्वांचे लाडके माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी १ जून २०२५ रोजी उरण तालुक्यातील २५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश दिला आहे . प्रत्येक दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा राहावा असे त्यांचे मत आहे. या करिता त्यांना व्यवसायासाठी मदत मिळावी म्हणून […]
घारापुरी ग्रामस्थांना कायमस्वरूपी कटलरी दुकाने मिळावीत म्हणून ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना दिले निवेदन.
उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) दिनांक ०२/०६/२०२५ रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उरण येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत घारापुरी यांचे वतीने विविध समस्या सोडविण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.१) घारापुरी हे बेट असल्याने येथील ग्रामस्थ कटलरी दुकाने लाऊन उपजीविका चालवतात. मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या कडून वारंवार दुकाने हटवण्यासाठी नोटिसा […]
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान सभेची कोकण भवनवर निदर्शने
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )सोमवार दिनांक २ जून २०२५ रोजी अखिल भारतीय किमान सभेच्या वतीने कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या घरे आणि जमिनीच्या प्रश्नावर राज्यभरात ही निदर्शने करण्यात आली. त्याचाच हा एक भाग होता. या संदर्भात किसान सभेच्या वतीने कोंकण भवन येथील सह आयुक्त पुनर्वसन कोकण विभाग […]
