नवीन बातम्या
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या भागामध्ये कोंबींग आपरेशन
स्पॅगेटी-रांजणपाडा-तळोजाकडे जाणार्‍या रस्त्यावर नो-पार्किंग झोन
पिडीत मुलीस फुस लावून नेणार्‍या तरुणास पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात
अज्ञात मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध सुरू
तरुण बेपत्ता
भावभावनांचा कल्लोळ प्रत्येकाच्या मनात असतो पुस्तकाचे प्रकाशन झाले,
*करंजाडे शहरात शिवसेनेच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली💐!*
पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे अवैध धंद्यांवर कारवाई
शेकाप नेते जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश“रायगड जिल्ह्यातील राजकारणाला नवा वळण”

शेकाप नेते जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश“रायगड जिल्ह्यातील राजकारणाला नवा वळण”


उलवे नोड, 10 मे – पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि शेकापचे ज्येष्ठ नेते मा. जे. एम. म्हात्रे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो समर्थकांनी उपस्थित राहून आपल्या नेत्यांना पाठिंबा दिला.



या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.



भाजपच्या नेतृत्वावर ठाम विश्वास
या प्रसंगी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी म्हटले, “देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तर राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. २०४७ पर्यंत भारत महासत्ता होईल, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे.” त्यांनी जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत भाजपमधील कार्यसंस्कृतीचा गौरव केला.

प्रभावशाली नेतृत्वाचा पक्षात प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, “म्हात्रे बंधूंचे सामाजिक आणि राजकीय कार्य क्षेत्र व्यापक आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांचा प्रवेश म्हणजे भाजपची ताकद अधिक वाढणे.”

प्रितम म्हात्रे यांचा दृष्टिकोन
प्रितम म्हात्रे म्हणाले, “माझ्यासोबत 19 माजी नगरसेवक, 4 जिल्हा परिषद सदस्य, 26 सरपंच, 63 ग्रामपंचायत सदस्य आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या विभागात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. त्या संधी युवकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे.”

रायगडमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात
या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top