नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

चिंचवण उड्डाणपुलावर दोन गाड्यांचा अपघात; चालक जखमी

पनवेल दि.१७ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दोन वाहनांचा अपघात होऊन यामध्ये टेम्पोचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल बाजूकडून पेण बाजूकडे खाद्यपदार्थाने भरलेला टेम्पो जात असताना त्याला औषध पोहोचवणे टेम्पो याने त्याला मागून धडक दिली. यामध्ये खाद्यपदार्थाने भरलेला टेम्पोमधील चालक जखमी झाला आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनीसोबत माधुरी लोखंडे यांनी वाढदिवस केला साजरा

पनवेल दि.१७ (वार्ताहर) : नवी मुंबईतील घणसोली येथील स्थायिक असलेले आणि शासकीय आदीवासी आश्रम शाळा चिंबीपाडा येथे स्त्री अधिक्षिका या पदावर  कार्यरत असलेल्या माधुरी लोखंडे शासकीय नोकरी मध्ये रुजू झाल्यापासून आपला वाढदिवस या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थीनी सोबत साजरा करून आपला वाढदिवसाचा आनंद या विद्यार्थ्यांसोबत सहभागी होऊन  साजरा करीत आहे.  सामाजिक भान ठेवून आपल्याला आनंद कसा […]

उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांना  पनवेल तालुक्यातील एक मोठा धक्का ,

उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांना  पनवेल तालुक्यातील एक मोठा धक्का , उपमुखंमंत्री एकनाथ शिदें यांच्या उपस्थितीत उबाठा गटाचे पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथशेठ पाटील शिवसेना शिंदे गट जाहीर प्रवेश केला. उबाठा गटाचे पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथशेठ पाटील यांनी अनेक पदाधिकार्‍यांसह काल रात्री उपमुखंमंत्री एकनाथ शिदें यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत […]

*सिद्धांत सामाजिक संस्थेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन*

पनवेल (दि.17)- सिद्धांत सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल मधील स्व.दि.बा.पाटील शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,   या स्पर्धेमध्ये वेगवेगळे गट मिळून एकूण 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पहिली ते सातवी शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच खुला गट अशा प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले होते. छत्रपती […]

महावाचन उत्सवात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या गार्गी महाडिक रायगड जिल्ह्यात प्रथम

पनवेल (प्रतिनिधी) महावाचन उत्सव उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूलमधील इयत्ता चौथीतील गार्गी महाडीक हिने उत्कृष्ट वाचन कौशल्याचे प्रदर्शन करत प्राथमिक गटातून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.        सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम राबवण्यात आला. हा […]

‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात; १५८९६ विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग

पनवेल (हरेश साठे) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ आंतरशालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यालयातील १५८९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील बक्षिसपात्र विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकनेते […]

शिवजयंती निमित्त ‘स्पर्धा गोष्टींची’

पनवेल (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल पनवेलतर्फे ‘स्पर्धा गोष्टींची’ या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.    शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गटात वय २५ ते ४५ वर्षे आणि ४५ वर्षेपुढील अशा गटात हि स्पर्धा होणार आहे. छत्रपती शिवाजी […]

शिवजयंती निमित्त भाजपच्यावतीने मराठा वेशभूषा स्पर्धा

पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १९ च्या वतीने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.     हि स्पर्धा १५ वर्षांखालील मुलामुलींसाठी असून स्पर्धेला शहरातील गावदेवी मंदिरापासून सकाळी ७. ३० वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार असून […]

पनवेल शहरासह कळंबोलीतून रिक्षाची चोरी

पनवेल दि.१६(संजय कदम ):  पनवेल शहरासह कळंबोली वसाहती मधून रिक्षाची चोरी झाल्याची घटना घडल्याने रिक्षा चालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.  पनवेल शहरातील जुने पोस्ट ऑफिस परिसरात संतोष दाबके यांनी त्यांची रिक्षा उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत केशव टाकरस यांनी […]

पनवेल परिसरात आढळला मृतदेह

पनवेल दि.१६(वार्ताहर):   पनवेल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह नव्याने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असलेल्या खाडीमध्ये आढळला असून त्याच्या नातेवाईकाचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे.    सदर अनोळखी बेवारस पुरुष इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, डोकयाचे केस काळे, डोळे उघडे व फुगलेले, तोंड उघडे असुन जीभ फुगीर बाहेर आलेली आहे. तर मिशी व […]

Back To Top