पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील साईकृपा धाब्याच्या समोर सर्व्हिस रोडवर ट्रक मध्ये झोपलेल्या इसमाच्या मोबाईलची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे . विशाल कुमकर ( वय ३३ ) हे ट्र्क मध्ये झोपलेले असताना कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील ८ ,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा फोन चोरून नेल्याने याबाबतची […]
भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. १९ – जुने सुतिकागृह विभागातर्फे गरजु विद्यार्थ्यांसाठी *’शालेय साहित्य वाटप’*
आज भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. १९ – जुने सुतिकागृह विभागातर्फे गरजु विद्यार्थ्यांसाठी *’शालेय साहित्य वाटप’* कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाअंतर्गत *१५०हुन अधिक* विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपण शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, भाजपा वरिष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन साहेब, मा. सभागृह नेते- युवकांचे प्रेरणास्थान परेशजी ठाकूर साहेब, […]
आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकर, पनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रम संपन्न
आज संपूर्ण महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. राज्यभरात सर्वत्र सरकारी शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, पनवेल तालुक्यातील शिवकर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमच शाळेत प्रवेश करणाऱ्या लहान विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, […]
कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त परिवाराची कार्यकारिणी जाहीर
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाचगाव कदम ग्रामस्थ एकत्र आले आहेत. गावातील ग्रामस्थांच्या उद्भवणार्या समस्या शासन दरबारी सोडवण्याकरिता वेळे, करंजवडे, जांब्रुक, रोहिणे, भवानी नगर या पाचगावातील नागरिकांनी एकत्र येत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवार या संघटनेची स्थापना करून कार्यकारिणीची निवड केली. ठाणे विश्रामगृह येथील बैठकीत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त […]
विवाहिता बेपत्ता
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार तिच्या पतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. माधुरी सुभाष सहानी (18 रा.तक्का) उंची साडे चार फुट, रंग गोरा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा उभट, बांधा सडपातळ, सोबत मोबाईल फोन आहे. या महिलेबाबत कोणाला […]
राष्ट्रपती पोलीस पदक सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे झाले वकीली परिक्षा पास
पनवेल, दि.12 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त असणारे सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे हे न्यायशास्त्राची 5 वर्ष डिग्री कोर्स असलेली परिक्षा उत्तम मार्काने उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनदंन करण्यात येत आहे. सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे यांनी न्याय शास्त्राची 5 वर्षे डिग्री कोर्स असलेली बी.एल.एस.एल.एल.बी परिक्षा उत्तम मार्काने उत्तीर्ण होवून वकील […]
रक्तदाते युवक हिच राष्ट्राची संपत्ती
रामदास शेवाळे:कळंबोली मध्ये रक्तदान शिबिर उत्साहात
पनवेल दि.16( प्रतिनिधी) ‘राज्यात रक्त न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचे पाहिले आहे. मात्र, पनवेल मध्ये अनेक रक्तदाते सामाजिक भान ठेवून कार्यरत आहेत. हे रक्तदाते युवक आपली खरी संपत्ती आहेत,’ असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी यांनी केले. कळंबोली येथे रामदास शेवाळे व उपमुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश शेवटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान […]
जुही गार्डन सोसायटीत सुशोभीकरण आणि लाद्या बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ
कामोठे 4K डिजिटल न्यूज चॅनल.जुही गार्डन को-ऑप. हौसिंग सोसायटीतर्फे आज सोसायटीच्या सुशोभीकरण तसेच दुकानांसमोरील लाद्या बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नारळ फोडून करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीचे सचिव सुरेश भोसले यांनी केले. यावेळी भाजप कामोठे शहर अध्यक्ष विकास घरत आणि नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार सोसायटीचे […]
सारडे गावातील महिलेचा सर्प दंशा ने मृत्यू
नागरिकांनी,शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे सर्प मित्रांचे आवाहन उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (वय ७७ ) हिला सर्प दंश झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता तीचा रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ( दि ४) घडली . त्यामुळे नागरिकांनी अशा सर्प दंशाच्या घटनापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण […]
जनजागृतीचा अभाव असल्याचे सांगत संतोष काटे यांनी केली खंत व्यक्त.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उलवे शहरातील व आजू बाजूच्या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदार जागृतीची तीव्र गरज भासत आहे. काही भागांमध्ये खऱ्या मतदाराला मतदान करता न आल्याच्या तक्रारी सतत पुढे येत असून, अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे.उलवे शहरात व आजूबाजूच्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्याची गरज निर्माण […]
