पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला. बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या.तसेच स्टार […]
गुगल मॅपने घेतले तीन जीव
गुगल मॅपवर विसंबून उड्डाण पुलावरून खाली पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. गुगल मॅपच्या आधारे बरेली, यूपी येथे एका कुटुंबाने कारने प्रवास केला. दाट धुक्यामुळे त्यांनी जीपीएस वापरून प्रवास केला. बांधकामाधीन पुलावरून जात असताना कार नदीत पडली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनोज जरांगेंचं महायुतीविषयी मोठं विधान
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवलं, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे . मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीविषयी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, ‘आज गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली, पण उद्याचा दिवस आमचा आहे. आरक्षण नाही मिळालं तर सरकारच्या छाताडावर बसणार, आता हे सरकार तुमचंय, तर मराठा आरक्षण […]
शरद पवार राजकारणातून सन्यास घेण्यावर रंगली चर्चा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 288 पैकी 231 जागांवर महायुती विजयी झाली, तर महाविकास आघाडीला केवळ 45 जागांवरच विजय मिळाला. या निकालानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा राजकारणातून सन्यास घेण्यावर चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या दारुण पराभवामुळे शरद पवार यांचे भवितव्य काय, अशी विचारणा आता राजकारणात होत आहे. महायुतीच्या विजयामुळे राज्याच्या […]
यंदा विधानसभा विरोधी पक्षनेत्याविनाच
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणाऱ्या 29 जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नाहीत. ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16, तर शरद पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर अतिआत्मविश्वासाने लढलेल्या मविआला मोठा धक्का बसला. महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला, तर मविआला विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढवली आहे. […]
महाविकास आघाडी ४६ जागांवर थांबली
महाविकास आघाडी ४६ जागांवर थांबली आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामुळे महाविकास आघाडीला पक्षनेतेपद मिळेल का, याबद्दल चर्चा सुरु आहे. इतर छोट्या पक्षांच्या जागांनाही या आकड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यावरून राजकीय वर्तमनात अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या भविष्यावर हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांचे पुढील राजकीय दिशा आणि भूमिका यावरून आगामी […]
विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार?
महाराष्ट्राचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला. अनेकांनी यावर संशय घेतला आहे. आता वकिल असीम सरोदेंनी एक फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे निकालाला आव्हा देणारी याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. ‘अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. निवडणूक निकाल अनाकलनीय […]
मी माझ्या विजयाने आनंदी नाही- जितेंद्र आव्हाड
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड विजयी झाले. अशातच, जितेंद्र आव्हाडांनी या विजयाचा आनंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सर्व दिग्गज नेते एकाचवेळी पराभूत होतील, असं होत नाही,’ असं ते म्हणाले. यासोबतच त्यांनी EVM मशीनवर आम्हाला विश्वास नसल्याचेही स्पष्ट केले, ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे मान्य आहे मान्य आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय, […]
पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी
साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या पाणवल्या कडा अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू […]
बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करत उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, “हिंदुत्व सोडून रडतरौतांच्या नादी लागणे तुम्हाला केवढ्याला पडले हे बघा, बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था झाली आहे.” तसेच, “रडतरौतांच्या उद्धटपणामुळेच […]