4k समाचार दि. 28 नवी मुंबईतील कोपरी येथील एका गाळ्यात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी छापा टाकला. या कारवाईत विक्रीसाठी आणलेला तब्बल दीड लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी राजीव झा, सत्या शुक्ला, मुमताज अहमद आणि शैलेश यादव या चौघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात […]
बालकामगार ठेवणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल
4k समाचार दि. 28 पनवेल शहर पोलिस ठाण्यात सावित्री पेट्रोल पंपाचे मालक मंजयकुमार राय यांच्यावर बालकामगार ठेवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान निरीक्षक गजानन जोंधळे यांनी पनवेलमध्ये कारवाई केली असता, पेट्रोल पंपावर केवळ १३ वर्षीय मुलगा गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम करताना आढळला. मुलाच्या वयाची कोणतीही अधिकृत कागदपत्रे मालकाकडे नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली. […]
जरांगेंना धक्का; गॅझेटची मागणी निरर्थक, शिंदे समितीनेच केली पोलखोल
4k समाचार दि. 28 मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी निरर्थक असल्याचं स्पष्ट झालं आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीने याबाबत अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. या तिन्ही […]
मनोज जरांगेंनी रणनीती बदलली; मराठा मोर्चा 7 टप्प्यांत राज्यभर उभारणार
4k समाचार दि. 28 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सरकारवर दबाव टाकणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता रणनीतीत बदल करत हे आंदोलन राज्यभर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 29 ऑगस्टपासून सात टप्प्यांत संपूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा उभारला जाणार आहे. आतापर्यंत मुंबईपुरते मर्यादित असलेले हे आंदोलन […]
जरांगेंच्या मोर्चादरम्यान हृदयविकाराने सहकाऱ्याचा अंत
4k समाचार दि. 28 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चादरम्यान मोठी घटना घडली आहे. अंतरवाली सराटी येथून निघालेला मोर्चा आज सकाळी जुन्नरमध्ये दाखल झाला असता, जरांगेंच्या एका सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे मोर्चात एकच खळबळ उडाली. याआधी मोर्चा निघण्यापूर्वी लातूरमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या […]
तळोजा औद्योगिक वसाहतीतील खड्ड्यांमुळे पुन्हा बळी; विवेक तिवारींचा मृत्यू
4k समाचार दि. 28 तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकत्याच जुलै महिन्यात एका तरुणाच्या हातावरून वाहनाचे चाक गेल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे. सीईटीपी प्रकल्पाशेजारील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ३६ वर्षीय विवेक तिवारी (रहिवासी – टिटवाळा, ठाणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विवेक तिवारी हे दुचाकीवरून रोडपाली […]
मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक
4k समाचार पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : कामोठे वसाहतीतील सेक्टर 35 येथील मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक झाला असून तातडीने पनवेल महानगरपालिकेने आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शिवसेने कडून करण्यात आली आहे . या संदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे […]
युवा सेनेच्या खारघरचा युवराज सर्वाजनिक गणेशाचे दिमाखदार आगमन
पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : युवा सेना ( ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या खारघरचा युवराज सर्वाजनिक गणेशाचे दिमाखदार आगमन झाले . शिवसेना महानगरप्रमुख व मंडळाचे अध्यक्ष अवचित राऊत , उपाध्यक्ष निखिल पानमंद , सचिव सागर जाधव , खजिनदार योगेश महाले , कार्याध्यक्ष अभिजित ओझा, सल्लागार संतोष ताकवले, रोहित बालगुडे आदींसह शेकडो जणांच्या […]
डॉ. अजिंक्य प्रकाश पाटील यांची शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कोकण
4k समाचार पनवेल दि. २८ ( संजय कदम ) : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या कर्तृत्वाला स्मरूण तसेच शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार डॉ. अजिंक्य प्रकाश पाटील यांची शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कोकण विभाग […]
पनवेलमध्ये स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात
4k समाचार दि. 28 पनवेल :पनवेल शहरातील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था स्वरसंस्कार संगीत विद्यालय याचा ११ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील कला, संस्कार आणि क्रीडा क्षेत्रात भक्कम पायाभूत कार्य करण्याच्या उद्देशाने ‘संस्कार प्रतिष्ठान’ या नव्या उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमासाठी अखिल […]
