*वर्षावास निमित्त धम्म बांधवांची गृह भेट उपक्रम*
4kNews कामोठे दि. 2 पनवेल: दिनांक २९ जुलै २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने वर्षावास (आषाढी पौर्णिमा) निमित्त धम्म बांधवांची गृह भेट हा उपक्रम उत्साहात पार पडला. तथागत बुद्धांच्या पहिल्या उपदेश दिनानिमित्त (धम्मचक्क पवत्तन सुत्त) आयोजित या कार्यक्रमास धम्म बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब […]
पनवेलच्या विकास आराखड्याला गती; नगररचना संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
4kNews कामोठे दि. 2 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांचा विकास आराखडा, शहराचे नियोजन , बांधकाम परवानग्या व लेआऊट मंजुरी तसेच विकासकांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात विविध विषयांवर नगररचना संचालनालयाचे संचालक मा. श्री. जितेंद्र भोपळे यांची भेट घेऊन सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली. या बैठकीस पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीनजी पाटील,मा. सभागृह नेते तथा नगरसेवक श्री. परेशशेठ ठाकूर […]
पनवेल पदाधिकारी राहुल गोगटे यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय मदत कक्षातून रुग्णास मिळाली ५८ हजारांची बिलातून सूट
4kNews कामोठे दि. 2 पनवेल / प्रतिनिधी : -संजय कदम पनवेल तालुक्यातील जाताडे या गावी राहणारा श्लोक किशोर म्हात्रे या सहा वर्षाय मुलगा घरात खेळताना पडला असता त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. मुलाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ठीक नसताना देखील त्यांनी नवी मुंबई बेलापूर अपोलो हॉस्पिटल येथे उपचारासाठी ठेवले.अशा परिस्थिती मुलाचे वडील किशोर म्हात्रे यांनी शिवसेना […]
पनवेलच्या इतिहासात प्रथमच शासकीय स्तरावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ; सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार यांच्या संकल्पनेला यश
“जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याचा दिवस” – महापौर नितीन पाटील
4kNews कामोठे दि. 2 पनवेल :(साबीर शेख)- पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय स्तरावर अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या भव्य सोहळ्याची संकल्पना सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार यांनी मांडली होती. त्यांच्या या प्रस्तावाला महापौर नितीन पाटील यांची तत्काळ मान्यता मिळाली, तर आमदार प्रशांत […]
सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉमध्ये जनजागृती उपक्रम आणि कायदे शिक्षणाच्या विविध उपक्रमांना नवी गती
4kNews कामोठे दि. 2 सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉ येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि कायदेविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. व्यसनमुक्त भारत अभियान (नशा मुक्त अभियान) अंतर्गत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात डॉ. शिल्पा प्रहार यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे वैज्ञानिक, मानसिक आणि मानसोपचारशास्त्रीय पैलू सोप्या भाषेत […]
Gutenberg Times: Gutenberg Changelog #133 – Gutenberg 23.6 Release and WordPress 7.1
In episode 133 of the Gutenberg Changelog Podcast, Birgit Pauli-Haack hosts Faith Ruth Imokol, a Ugandan web developer and longtime Gutenberg advocate, to discuss the Gutenberg 23.6 release and the upcoming WordPress 7.1 update. The episode opens with insights into the WordPress community in Uganda, highlighting their active WordCamp scene and educational initiatives such as […]
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विद्यार्थ्यांसाठी विदुषी शुभदा पराडकर यांचे विशेष मार्गदर्शन
4kNews कामोठे दि. 30 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका व विदुषी शुभदा पराडकर या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. संगीत […]
चाळीशीनंतर पेरिमेनोपॉजच्या तक्रारींमध्ये वाढ; हार्मोन थेरपीकडे महिलांचा वाढता कल ः प्रसुती व स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुरभी सिद्धार्थ
4kNews कामोठे पनवेल, दि. 30 (वार्ताहर) ः चाळीशीनंतर महिलांमध्ये पेरिमेनोपॉजशी संबंधित तक्रारी वाढत असून, वेळेवर निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. हार्मोनल आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि सोशल मीडियावरील माहितीमुळे अनेक महिला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी या उपचारपद्धतीकडे वळत आहेत. खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ […]
पनवेलमध्ये श्री साई नारायण बाबा आश्रमात श्री गुरु पौर्णिमा उत्सव भक्तिभावाने संपन्न
अभिषेक, मंत्रोपदेश, महाचरण पूजा व महाप्रसादात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
4kNews कामोठे पनवेल, दि. 30 (वार्ताहर) : पनवेल येथील स्टेशन रोडवरील श्री साई नारायण बाबा आश्रम आणि श्री साईबाबा मंदिरात श्री गुरु पौर्णिमा उत्सव बुधवारी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. परमपूज्य सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या पावन सान्निध्यात झालेल्या या सोहळ्यास पनवेलसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सकाळी […]
सकाळच्या फेरफटक्यासाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक बेपत्ता; नागरिकांना शोधकार्यात सहकार्याचे आवाहन
4kNews दि. 30देहू : देहू–आळंदी BRTS रोड परिसरातील गायत्री लिगसी सोसायटीत राहणारे पुरुषोत्तम शंकर खराडे (वय अंदाजे ६५ वर्षे) हे सकाळच्या नियमित फेरफटक्यासाठी घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्री. खराडे हे ५ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता त्यांच्या निवासस्थान A-103, Gayatrree Legacy, शेल पेट्रोल पंपाजवळ, देहू–आळंदी BRTS रोड येथून मॉर्निंग वॉकसाठी […]
