अनुभवात्मक शिक्षण हे रॉट (घोकमपट्टी) किंवा व्याख्यानात्माक किंवा निर्देशात्मक व्याख्यान शिक्षणापेक्षा वेगळे आहे. अनुभवात्मक शिक्षण ही कृती करून शिकण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना अनुभव आणि प्रतिबिंबांमध्ये गुंतवून ठेवल्याने, ते वर्गात शिकलेले सिद्धांत आणि ज्ञान वास्तविक-जगातील परिस्थितींशी जोडण्यात अधिक सक्षम आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पीसीई) , आणि पिल्लई कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पीआयसीए) […]
गाडीला टकटक करून गाडीतील मौल्यवान वस्तू लांबविणार्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
पनवेल, दि.5 (4kNews) ः उभ्या गाडीला टकटक करून गाडीवरील चालकास जमिनीवर काहीतरी पडल्याचे सांगून सदर चालक गाडी बाहेर उतरले असताना संगनमताने गाडीतील मौल्यवान वस्तू पळविणार्या टोळीतील एकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत पिंगळे हे त्यांच्या महिंद्रा कंपनीच्या गाडीतून मिटींगसाठी गार्डन हॉटेल परिसरात आले असताना त्यांच्या गाडीच्या पाठीमागील सिटवर रोख रक्कम असलेली बॅग ठेवली […]
सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम ह्या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध
पनवेल, दि.5 (4kNews) ः सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे. गेल्या तीन महिन्यात या पुस्तकाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने पहिल्या दोन्ही आवृत्या संपल्याने व वाढत्या मागणीनुसार त्यांनी आता तीन महिन्यात तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध केली आहे. तसेच वाचक मित्रांनी आधीच आपली प्रत बुक केल्यामुळे […]
कळंबोली सर्कलला कोंडीचा फेरा,मुंब्रा,पनवेल उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल
पनवेल, दि.5 (वार्ताहर) कामोठे (4kNews)ः कळंबोली सर्कल येथील मुंब्रा पनवेल महामार्गावर बांधलेला उड्डाणपुल हा सध्या अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल बनला आहे. कळंबोली सर्कलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न वाहतूक पोलीस सोडवू न शकत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. या सर्कलवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सात ते आठ पोलीस कर्मचारी आणि वाहतूक वार्डन पोलीसांच्या मदतीला असतानाही वाहनचालकांना कळंबोली सर्कलवर […]
प्रबुद्ध सामाजिक संस्था (रजि.) करंजाडे माध्यमातून कॅन्डल मार्च आयोजन
दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक से.३ करंजाडे. ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पनवेल येथे कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयु. कुणाल लोंढे (सचिव – रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ, करंजाडे […]
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव
कामोठे (4kNews)जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. दिनांक 03 /12 /2024 रोजी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक् अक्षम मुलांची विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगाना प्रोत्साहन मिळावे व […]
महापालिकेची चारही प्रभागात अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई,
पनवेल,दि.04: पनवेल महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण विभागांतर्गत प्रभाग कार्यालयाच्यावतीने गेल्या दोन दिवसापासून हातगाड्यांवर तसेच अनधिकृत्या बांधलेल्या झोपड्या, दुकानांबाहेर अनधिकृतरित्या ठेवलेल्या सामानांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार तोडक कारवाई करण्यात येत आहे. फूटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. शहरातील हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळे होत असल्याने मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी कळंबोली मध्ये सुमारे 12 हातगाड्यांवरती […]
अॅड.मनोज भुजबळ यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजतर्फे आले गौरविण्यात
पनवेल, दि.4 (4kNews) ः वकील दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजतर्फे नामांकित वकील मनोज भुजबळ यांना सर्टीफिकेट देवून गौरविण्यात आले आहे. अॅड.मनोज भुजबळ यांनी आतापर्यंत केलेल्या कामााचे रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे प्रेसिडंट रो.विजय गोरेगावकर, सचिव रो.रुपेश यादव, व्होकेशनल डायरेक्टर रो.काशिराम पाटील, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रो.शितल शहा, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर रो.मधुमिता बर्वे आदींनी कौतुक […]
पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे गंभीर दुखापत अपघात झाला आहे.
अपघात ता.वेळ व ठिकाण :-आज दि.04/12/2024 रोजी 12:20 वाजताचे सुमारास दृतगती मार्गाचे पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे अपघात झाला आहे. गंभीर दुखापत अपघात अपघातातील वाहन :-1) अल्टो कार क्र-MH03CB48602) अज्ञात वाहन अपघातामधीलगंभीर जखमी( अल्टो कार क्र-MH03CB4860 ) 1) कल्पना वसंत सैद वय 572) कविता लक्ष्मण शिंगोटे वय603) वसंत सदाशिव सैद वय 624)लक्ष्मण […]
स्वस्तिका घोषने पटकाविला विजेतेपद; ऑलिंपियन खेळाडूला केले पराभूत; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून स्वस्तिकाचे अभिनंदन !
पनवेल (प्रतिनिधी)4kNews अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस ५१ व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू व सिकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत दैदिप्यमान कामगिरी केली. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोष हिचे अभिनंदन केले. २४ ते […]