सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मोहोपाडा रसायनी येथे सुपर स्पेशालिटी अष्टविनायक हॉस्पिटलचे लोकार्पण सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासांबे आणि माजी महिला बाल सभापती रायगड जिल्हा परिषद सौ. उमाताई संदीप मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यासाठी रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर बांगर सर ही उपस्तिथ होते. 18 वर्षांपासून अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलोनी, नविन पनवेल (पश्चिम) […]
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
पनवेलकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा
थंडीची चाहूल लागताच पनवेलमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे, धुलिकणांच्या त्रासामुळे श्वसनविषयक आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पालिकेच्या दवाखान्यातून मोफत उपचार केले जात असले तरी खासगी दवाखान्यातील रुग्णांचा ओघही कमी झालेला नाही. दरम्यान, पालिकेने सर्व दवाखाने आता पूर्णवेळ म्हणजेच सकाळी 10 ते रात्री 10 असे बारा तास सुरू ठेवले असल्याने रुग्णांना […]
आई-बहीणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड, मोठा निर्णय
शिव्या देणं हे अपमानास्पद वागणूक देण्यासारखे आहे. भांडणात शिव्या दिल्यास लहान मुलांवर देखील याचा वाईट परिणाम होतो. यामुळेच महाराष्ट्रातील सौंदाळा गावाने अपशब्द वापरणारे तसेच आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात नवा नियम लागू केला आहे. येथील सरपंच शरद अरगडे यांनी ग्रामसभेत याबाबत ठराव पारित केलाय. या नियमानुसार आता सौंदाळ गावात शिवीगाळ करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागणार […]
शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता
राज्यातील विधानसभा निकालानंतर 8 दिवस उलटूनही सरकार स्थापन झालेले नाही. भाजप महायुतीला 237 जागांचे बहुमत मिळाले असून भाजपने 132, शिंदे गटाने 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लांबला असला, तरी शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून देवेंद्र फडणवीस […]
मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी ही माहिती दिली. जाधव यांनी पत्रात नमूद केले की, “पराभवाची जबाबदारी घेत मी राजीनामा देत आहे. काम करताना कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमस्व.” त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेसाठी […]
विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा
पनवेल (प्रतिनिधी) बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३. ३० वाजता ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे. नवी, मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई तसेच राज्यातील […]
राज्यस्तरीय ११ व्या ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन
पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल […]
सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभाग घ्यावा- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळावे आहे, आता पक्षवाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन पर्व २०२४ सदस्यता अभियान आयोजित करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने नियोजनाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या […]
मृतांना 10 लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ शिवशाही बस उलटली, ज्यात 7-8 प्रवासी मृत्यूमुखी पडले, आणखी 5-7 मृतदेह बसमध्ये अडकल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी मृतांना 10 लाखांची मदत दिल्याचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत जखर्मीना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले.
