नाणीज धर्मपीठाचे रामानंदाचार्य स्वामी श्री. नरेंद्राचार्य महाराज यांची रत्नागिरी येथील नाणीजधाम येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी हिंदू समाजाच्या उत्थानासाठी शुभेच्छा दिल्या . नुकताच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येण्यासाठी महाराजांनी दिलेल्या आशिर्वादाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार
एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल
एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल त्यातून अनेक संदेश जातील, भाजपा आपलेच म्हणणे खरे करते, मित्रपक्षाला मान देत नाही आणि मित्रपक्षाला वापरून सोडून देते. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली होती आणि याला भरपूर यश आले तर त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी आणि त्याच्या सहकार्यानी […]
मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्यांचे मागवले रिपोर्ट कार्ड
महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरला आहे. पण त्याची नावे जाहिर झालेली नाहीत. त्यातच आता मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांचे रिपोर्ड कार्ड केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मागवले आहे. यात आमदाराने लोकसभा, विधानसभेच महायुतीचे काम प्रमाणिकपणे केले का? निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता? माजी मंत्री पुन्हा इच्छुक असेल तर त्याने मंत्रालयात कसे आणि किती वेळ काम केले? यासह अनेक बाबी तपासल्या […]
अजित पवारांचा ‘सोनेरी काळ’ सुरू
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अजित पवारांचा ‘सोनेरी काळ’ सुरू झाल्याचे दिसत आहे. शरद पवार गटातील माजी आमदारांनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) नेते अपूर्व हिरे यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली आहे. निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या गटात गेलेल्या हिरे यांच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, शरद पवार गटातील राहुल जगताप व मानसिंग नाईक […]
मनसेतील दोन जिल्हाप्रमुखांमधील वाद राज ठाकरेंपर्यंत
मनसेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये निर्माण झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. अविनाश जाधव यांनी समीर मोर यांच्या भावाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मनसेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हा विषय थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दरबारात पोहोचला आहे. आता या प्रकरणावर राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेसाठी निमंत्रण
भारताच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या मतदानातील तफावतीबाबतच्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत पक्षाला मंगळवार, ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी बोलावले आहे. ईसीआयने म्हटले आहे की, काँग्रेसच्या सर्व कायदेशीर समस्यांचे पुनरावलोकन करून त्यावर लेखी उत्तर देण्याचे आयोगाने आश्वासन दिले आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतही पारदर्शकता असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून काँग्रेसच्या समस्यांवर योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.
डॉ. अपूर्व हिरे आणि मानसिंग नाईक अजित पवार गटात !
शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि श्रीगोंदा विधानसभेतील अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. तसेच, शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंग नाईक देखील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. या भेटींमुळे दोघेही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. […]
मनोज जरांगेंचा मराठा समाजाविषयी खुलासा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी मराठा समाजाचे उमेदवार उभे केले असते तर इतर सर्वांचा सुपडासाफ झाला असता. मी मराठा समाजाचा सच्चा सेवक आहे. मराठा समाज कोणाच्याही दावणीला बांधणार नाही. समाज मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही, असा खुलासा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मी आणि […]
आई-बहीणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड, मोठा निर्णय
शिव्या देणं हे अपमानास्पद वागणूक देण्यासारखे आहे. भांडणात शिव्या दिल्यास लहान मुलांवर देखील याचा वाईट परिणाम होतो. यामुळेच महाराष्ट्रातील सौंदाळा गावाने अपशब्द वापरणारे तसेच आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात नवा नियम लागू केला आहे. येथील सरपंच शरद अरगडे यांनी ग्रामसभेत याबाबत ठराव पारित केलाय. या नियमानुसार आता सौंदाळ गावात शिवीगाळ करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागणार […]
शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता
राज्यातील विधानसभा निकालानंतर 8 दिवस उलटूनही सरकार स्थापन झालेले नाही. भाजप महायुतीला 237 जागांचे बहुमत मिळाले असून भाजपने 132, शिंदे गटाने 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लांबला असला, तरी शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून देवेंद्र फडणवीस […]