नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

वाल्मिक कराड ला फाशी द्या युवासेनेची जाहीर मागणी

पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना कठोर म्हणजेच  फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पनवेल विधानसभा क्षेत्र खारघर येथे युवासेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेनेकडून राज्य सचिव रुपेश पाटील, उपजिल्हा प्रमुख रोशन पवार, यूवासेना पनवेल विधानसभा अध्यक्ष क्षितिज शिंगरे, विधानसभा सचिव रोशन पुजारी, […]

वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थित आज तळोजात 10 कोटींचे अंमली पदार्थ करण्यात आले नष्ट

पनवेल, दि.26 (संजय कदम) ः महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज तळोजा 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.विविध ठिकाणच्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्याची कारवाई यंत्रणांकडून केली जाते. नवी मुंबई पोलिसांनी विविध दाखल गुन्हयांत यापूर्वी सुमारे 10 कोटींचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला असून सदरचा हा अंमली पदार्थांचा […]

शिवसेना पक्षात तळोजा घोट गाव परिसरातील शेकडो युवकांचा प्रवेश

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन व शिवसेना मुख्य नेते  एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या व  माझ्या मार्गदर्शनाखाली तळोजा शहराचे शहर प्रमुख विशाल पवार व घोटगाव चे विभाग प्रमुख आशिष हवालदार यांच्या संकल्पनेतून पनवेल विधानसभा भागातील तळोजा शहर मधल्या घोटगाव […]

*शिवसेनेतर्फे देण्यात आली पनवेल मधील महापालिका शाळांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन्स!*

पनवेल मॉडेल’ म्हणत एकनाथ शिंदे यांनी केले तोंड भरून कौतुक… दहा लाखाची तात्काळ मदत जाहीर“लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ” अशी ओळख निर्माण झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची ही ओळख पुढे घेऊन जाण्यासाठी पनवेलमध्ये महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या कल्पनेतून व नेतृत्वात पनवेल शिवसेनेने महापालिका हद्दीतील 11 शाळांमधील […]

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल तर्फे महिला दीना निमित्त अभिनव उपक्रम*

पनवेल दि.२७(संजय कदम)  सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल तर्फे महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे.   महिला दीना महिला सदस्यांना आपल्या घरी पुन्हा वापरणे योग्य जुने कपडे व्येवस्थित धुऊन घडी करून द्यावे अथवा भेट आलेल्या पण आपण वापरत नसलेल्या नवीन साड्या देखील चालतील त्या दिनांक ५ मार्च २०२५ पर्यंत आपल्या ऑफिस मध्ये द्याव्या. […]

आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा दिलासा – आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पनवेल शहरातील हजारो नागरिकांना रहिवासी पुरावा विषयात अडचण निर्माण झाली होती,रहिवासी पुराव्याच्या अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती.   सामान्य कुटुंबातील विद्यार्थी या सवलतीच्या माध्यमातून शिक्षण घेतात, महाराष्ट्रातील अनेक कुटुंब पनवेल शहरात नोकरी निमित्त स्थलांतरित झाले असून, पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने […]

*बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स,पनवेल.महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*

पनवेल दि.२७(वार्ताहर): कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स,पनवेल.महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा दिवस, जो मराठी भाषेच्या गौरवासाठी समर्पित आहे. मराठीच्या समृद्ध परंपरेचा सन्मान राखत, विद्यार्थ्यांना भाषेच्या जतन व संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी हा […]

*श्री सद्‌गुरु वामन बाबा महाराज पुरस्काराने बबनदादा पाटील यांना करण्यात आले सन्मानित*

पनवेल दि.२७(वार्ताहर): श्री सद्‌गुरु वामन बाबा महाराज पुरस्काराने बबनदादा पाटील यांना महाशिवरात्रीचे औचित्यसाधून सन्मानित करण्यात आले.    वैकुंठवासी श्री सद्‌गुरु वामन बाबा महाराज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या सत्पुरुषांच्या आर्शिवादाने बबन दादा पाटील यांनी समाजाची बांधिलकी स्विकारून राजकीय व सामाजिक चळवळ जिवंत ठेवून शाळा कॉलेज निर्माण करून बहुजन समाजाला ज्ञानाचा मार्ग सुलभ करन्न सेवेच व्रत धारण […]

*महिला बेपत्ता*

पनवेल दि.२७(वार्ताहर): राहत्या घरातून कामानिमित्त बाहेर पडलेली महिला अद्याप घरी न परतल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  सदर महिलेचे नाव मुस्कान इक्बाल शेख (वय १९ वर्षे रा चिंध्रण) असून तिचा रंग गोरा, उंची ५ फुट, बांधा मध्यम, अंगात नेसून गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल घातलेली. सोबत काळया रंगाची बॅग, […]

*लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*

पनवेल दि.२७(वार्ताहर) रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लब च्या वतीने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी येत्या शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.   आजच्या धावपळीच्या युगात.. वाढणारी  वाहनांची वर्दळ… होणारी ट्रॅफिक.. […]

Back To Top