पनवेल दि.१३ (संजय कदम) : सालाबादप्रमाणे यंदाही दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये पनवेल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत तिन्ही शाळेंनी दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत केली जाते. यातूनच विद्यार्थी मनापासून शिक्षण घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतात. यंदाही पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या […]
स्कुटी गाडीची चोरी
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील शिवशंभो नाका येथील न्यू पंजाब हॉटेल समोर उभी करून ठेवलेली दुचाकी गाडी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दिनेश राजानी यांनी त्यांची 20 हजार रुपये किंमतीची होंडा अॅक्टीव्हा गाडी ही हॉटेल समोर उभी असताना अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बोलण्यात गुंतवून दुकानातील रोख रक्कम केली लंपास
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः बोलण्यात गुंतवून दोघा अनोळखी व्यक्तींनी दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून दुकानातील कॅश काऊंटरमधून रोख रक्कम लंपास केल्याची घटना ओरियन मॉलमध्ये घडली आहे. येथील अमुक्ती शॉपमध्ये दोन अनोळखी व्यक्ती त्यामध्ये एक पुरुष व एक महिला ग्राहक बनून दुकानात आले व त्या पैकी अनोळखी मुलीने दुकानातील कर्मचार्याला बोलण्यात गुंतवून तिच्याबरोबर असलेल्या मुलाने दुकानातील कॅश […]
अज्ञात चोरट्याने केली सुपर मार्केट शॉपमध्ये चोरी
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः एका अज्ञात चोरट्याने पनवेल तालुक्यातील नेरे सुपर मार्केट शॉपमध्ये चोरी करून आतील ऐवज तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. नेरे सुपर मार्केट शॉपचे शटर अज्ञात चोरट्याने कश्याचे तरी सहाय्याने तोडून व आत प्रवेश करून दुकानातील विविध सामान व रोख रक्कम असा मिळून जवळपास 71 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज […]
शिवशक्ती मित्र मंडळ, लाईन आळी पनवेलने आयोजित लाईन आळी क्रिकेट प्रिमियर लीग 2025 अलंकार फाईटर्स प्रथम तर अभिज स्ट्रायकर्स द्वितीय
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः शिवशक्ती मित्र मंडळ, लाईन आळी पनवेलने आयोजित केलेल्या लाईन आळी क्रिकेट प्रिमियर लीग 2025 अलंकार फाईटर्स प्रथम तर अभिज स्ट्रायकर्स द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. शिवशक्ती मित्र मंडळ, लाईन आळी पनवेल लाईन आळी प्रीमियर लिग – 2025 यंदाचे 10 वे वर्ष होते. संघ मालक अलंकार महाजन ह्यांचा अलंकार फाईटर्स प्रथम व उप […]
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या भागामध्ये कोंबींग आपरेशन
मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, मा.सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 10/05/2025 रोजी 17.00 ते दि. 11/05/2025 रोजी 04. 00 वाजेपर्यंत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या भागामध्ये कोंबींग आपरेशन दरम्यान अवैध दारू विक्री, एन डी पी एस इत्यादी अवैद्य धंद्यांवर कारवाया केल्या. तसेच खारपाडा टोलनाका येथे नाकाबंदी दरम्यान नियमांचे […]
स्पॅगेटी-रांजणपाडा-तळोजाकडे जाणार्या रस्त्यावर नो-पार्किंग झोन
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः खारघरमधील स्पॅगेटी, रांजणपाडा ते तळोजाकडे जाणार्या रस्त्यावर खासगी बसेस मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क केल्या जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी पार्क केल्या जाणार्या खासगी बसेसमुळे अपघात होऊ नयेत, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व अत्यावश्यक सेवेतील तसेच इतर वाहनांना सदरचा रस्ता सुकर होण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने, शासकीय वाहने […]
पिडीत मुलीस फुस लावून नेणार्या तरुणास पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः पिडीत मुलीस फुस लावून कायदेशीर पालकांच्या ताब्यातून घेऊन जाऊन बाहेर राज्यात पसार झालेल्या आरोपीस पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा पाठलाग करून अखेरीस त्याला पिडीत मुलीसह ताब्यात घेतले आहे. या संदर्भात सदर मुलीच्या पालकांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दीपक शेळके, […]
अज्ञात मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध सुरू
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल शहर परिसरात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे नाव अजय करन निशाद (45 रा.लोखंडीपाडा) असे असून या ठिकाणी एकटाच राहत होता व मिळेल ते काम करत असे. त्याच्या डोक्यावरील केस काळे, मिशी व दाढी बारीक, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 3 इंच आहे. […]
तरुण बेपत्ता
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पत्नीला भेटण्यासाठी ठाण्याला जात आहे असे सांगून घरातून निघून गेलेला 32 वर्षीय तरुण घर न परतल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली आहे. आदित दिलीप क्षीरसागर (32) असे त्याचे नाव आहे. त्याचा रंग सावळा, उंची पाच फूट दहा इंच, मध्यम बांधा, उभट चेहरा, नाक सरळ असे त्याचे […]