पनवेल, दि.15 (संजय कदम) ः कामगार क्षेत्रात अल्पवधीत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कामगार नेते संजय कलावती वासुदेव पवार यांना नुकताच कोल्हापूर रत्न 2025 हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.संजय पवार यांनी मागील 25 वर्ष कामगार व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. विविध आंदोलने केली आहेत. तसेच माता भगिनींवर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला […]
अज्ञात कारणावरुन सहकार्याची केली आरोपीने 20 किलो वजन डोक्यात टाकून हत्या
पनवेल, दि.15 (संजय कदम) ः अज्ञात करणावरुन आपल्या सहकार्याच्या डोक्यात 20 किलो वजन टाकून त्याची हत्या केल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे. ताराचंद गुप्ता यांच्याकडे काम करणारा आरोपी धरम गोपाल राय (27 रा.उत्तरप्रदेश) याने त्याच दुकानात काम करणारा दुसरा कामगार अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू (29 रा.उत्तरप्रदेश) यांच्यात अज्ञात कारणावरुन आरोपी धरम राय याने अनिल […]
काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव ; करण्यात येत आहे कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. या भरावाच्या कामा दरम्यान नदीच्या पात्रातही भर टाकण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील गावामध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे तरी अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना […]
जागतिक महिला दिनानिमित्त रायगड प्रेस क्लब संलग्न
पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता ः आयुक्त मंगेश चितळेपनवेल, दि.10 (वार्ताहर) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रायगड प्रेस क्लब संलग्न पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेलचे महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, तहसीलदार विजय पाटील, अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे, पिल्लई कॉलेजच्या निवेदिता श्रेयन्स आणि […]
विरुपाक्ष मंदिरातील कीर्तनसप्ताहाची सांगता
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः येथील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरामधे 24 वा नारदीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला. प्रारंभ झालेल्या या सप्ताहाची सांगता रसायनी येथील ह. भ. प. सच्चिदानंद महाराज कांबेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या सप्ताहामधे राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांनी आपली सेवा सादर केली. यावेळी कीर्तनसेवेसाठी हरिपाठ ही संकल्पना ठरविण्यात आली होती. त्याला अनुसरून कीर्तनकारानी हरिपाठातील अभंगांवर […]
पनवेलमध्ये महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आर.एस.एस.चे माजी सहकार्यवाी भैयाजी जोशी यांचा निषेध
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेल विधानसभा-188 महाविकास आघाडी मार्फत महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान मराठी भाषेच्या विरोधात मुंबई, महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा ही सक्तीची नाही असे बेताल वक्तव्य करून मराठी माणसाचा अपमान करणार्या आर.एस.एस.चे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणार्या कर्तृत्ववान डॉक्टर महिलांचा केला सत्कार पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणार्या कर्तुत्वावर महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.तसेच प्राणिक हिलिंग प्रणालीच्या माध्यमातून रुग्णसेवा देणार्या कर्तुत्ववान महिलांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा […]
चार वाहनांच्या अपघातात 3 जण जखमी
चार वाहनांच्या अपघातात 3 जण जखमीपनवेल, दि.6 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीत आज झालेल्या चार वाहनांच्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी.09/600 कोन गाव जवळ पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत यातील कंटेनर क्रमांक एनएल-01-एएच- 8598 यावरील चालक (नाव माहित […]
सीकेटी महाविद्यालयात आंतर-महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा दिनांक ५ व ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे सीकेटी कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के.पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये ६ महाविद्यालयातील मुलींच्या ४ संघानी व […]
एकाच कुटुंबातील दोन वेळा गाडी जाळणार्या आरोपींचा शोध सुरू
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः पनवेल शहरात राहणार्या एकाच कुटुंबातील दोन वेळा गाडी जाळणार्या अज्ञात व्यक्तींचा शोध पनवेल शहर पोलीस करीत असून याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पनवेल शहर पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये अज्ञात व्यक्ती या […]
