4k समाचार दि. 17 पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिला जाणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ने रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला प्रदान करून केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक […]
पुढील वर्षी होणार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाने दिली 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली: (4Kसमाचार)गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या मुदतवाढीच्या मागणीला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ओबीसी […]
शेकापतून भाजपमध्ये आलेले हरेश केणी यांचा अखेर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
4k समाचार पनवेल दि. 16 शेकापमधून काही वर्षापूर्वी भाजपमध्ये आलेले हरेश केणी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभागात भाजपविरोधी मतदार जास्त असल्याने महापालिका निवडणुकीत फटका बसू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. शेकापमधून हरेश केणी हे प्रभाग 3 मधून निवडून आले होते.हा भाग तळोजा विभागातील मुस्लिम […]
आयुक्तांचा कंत्राटदारांना सज्जड दम
4k समाचार पनवेल, दि. १६ सप्टेंबर – पनवेल महापालिका क्षेत्रात रस्त्यांचे डांबरीकरण मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब डांबरीकरणामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून वाहनधारक आणि रहिवाशांकडून पालिकेकडे तक्रारींचा अक्षरशः पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी ठेकेदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत सज्जड दम दिला […]
तडीपार गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह घेतले ताब्यात
4k समाचार पनवेल, दि.15 (संजय कदम) ः सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातून दोेन वर्षाकरिता तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह ताब्यात घेतले आहे.तालुक्यातील अजिवली येथे राहणारे कृष्णा चव्हाण यांच्या ट्रान्सपोर्टची महेंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्र.एमएच-46-सीयु-7123 ही 10 लाख रुपये किंमतीची गाडी चोरीस गेल्याप्रकरणी […]
कळंबोलीत शिवसेनेची ताकद वाढली अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश
4 समाचार पनवेल ता.15 ( बातमीदार) मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माधव एरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य […]
भारत–पाक सामना – जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे
काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. भारतीय सेनेने धाडसी कारवाया करून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या जखमा आजही ताज्याच आहेत. शहिदांच्या बलिदानाची सावली अजूनही जनमानसावर आहे. अशा वेळी भारत–पाक क्रिकेट सामना खेळवण्यास परवानगी देणे हे भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे आहे. सरकारने […]
लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार” जाहीर; मुंबई विद्यापीठाकडून सन्मान
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय’ पुरस्कारासाठी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी […]
एमकेसीएल प्रादेशिक बैठकीत नव्या संकल्पांचा उच्चार
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आयोजित प्रादेशिक बैठक पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे २०० केंद्रांचे एएलसी समन्वयक सहभागी झाले होते. विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण, अनुभवांची देवाणघेवाण तसेच आगामी योजनांवर सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. भविष्यात पनवेल परिसरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा प्रसार वेगाने […]
सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख; गावांची नावे पूर्ववत
4k समाचार दि. 13 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-१, आर-२, आर-३, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून […]
