महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 288 पैकी 231 जागांवर महायुती विजयी झाली, तर महाविकास आघाडीला केवळ 45 जागांवरच विजय मिळाला. या निकालानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा राजकारणातून सन्यास घेण्यावर चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या दारुण पराभवामुळे शरद पवार यांचे भवितव्य काय, अशी विचारणा आता राजकारणात होत आहे. महायुतीच्या विजयामुळे राज्याच्या […]
यंदा विधानसभा विरोधी पक्षनेत्याविनाच
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणाऱ्या 29 जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नाहीत. ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16, तर शरद पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर अतिआत्मविश्वासाने लढलेल्या मविआला मोठा धक्का बसला. महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला, तर मविआला विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढवली आहे. […]
महाविकास आघाडी ४६ जागांवर थांबली
महाविकास आघाडी ४६ जागांवर थांबली आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामुळे महाविकास आघाडीला पक्षनेतेपद मिळेल का, याबद्दल चर्चा सुरु आहे. इतर छोट्या पक्षांच्या जागांनाही या आकड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यावरून राजकीय वर्तमनात अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या भविष्यावर हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांचे पुढील राजकीय दिशा आणि भूमिका यावरून आगामी […]
विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार?
महाराष्ट्राचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला. अनेकांनी यावर संशय घेतला आहे. आता वकिल असीम सरोदेंनी एक फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे निकालाला आव्हा देणारी याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. ‘अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. निवडणूक निकाल अनाकलनीय […]
मी माझ्या विजयाने आनंदी नाही- जितेंद्र आव्हाड
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड विजयी झाले. अशातच, जितेंद्र आव्हाडांनी या विजयाचा आनंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सर्व दिग्गज नेते एकाचवेळी पराभूत होतील, असं होत नाही,’ असं ते म्हणाले. यासोबतच त्यांनी EVM मशीनवर आम्हाला विश्वास नसल्याचेही स्पष्ट केले, ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे मान्य आहे मान्य आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय, […]
बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करत उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, “हिंदुत्व सोडून रडतरौतांच्या नादी लागणे तुम्हाला केवढ्याला पडले हे बघा, बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था झाली आहे.” तसेच, “रडतरौतांच्या उद्धटपणामुळेच […]
रणजितसिंह मोहिते पाटलांच भाजपा मधून हकालपट्टी व्हावी’
‘माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंट ला धमक्या दिल्या. रणजितसिंह मोहिते पाटील यांची […]
25 तारखेला सोमवारी वानखेडे स्टेडियमला शपथविधी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा एकदा सर्वात जास्त मतं मिळाले असून, महायुतीला एकत्र 234 जागांवर विजय मिळाला आहे. 1990 नंतर भाजपने तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या असून, या विक्रमामुळे भाजप एकमेव पक्ष म्हणून ठरला आहे. नव्या सरकारचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याची माहिती आहे. शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर […]
मराठवाड्यात महायुतीचा डंका, 46 पैकी 40 जागांवर विजयाचा गुलाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतमोजण्यांनंतर मतदारांचा कौल महायुतीलाच मिळाल्याचं पहायला मिळाले. 288 जागांपैकी 235 जागा मिळवत राज्यात महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला. महाविकास आघाडीला 50 चा आकडाही ओलांडला आला नाही. मराठवाड्यातही महाविकास आघाडी धारातिर्थी पडल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातील 46 मतदारसंघांपैकी 40 जागांवर महायुतीच ‘लाडकी’ ठरल्याचं समोर आलं आहे. तर, मराठवाड्यामध्येही मनोज जरांगेंची ताकद असताना, त्यांचा सुफडा साफ […]
अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. काही वेळा पूर्वी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमताने अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये देखील बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमत चाचणी होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना महत्त्व प्राप्त होतंय. काल निकाल लागला आणि महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं […]