नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: उरण

मोफत गणवेश वाटप व  फुंडे विद्यालयात विविध समित्या पुनर्गठीत

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत इयत्ता ५ वी ते १० वी मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सारिका पाटील -बोकडविरा, चंद्रविलास घरत भेंडखळ, निलेश ठाकूर शिवाजी नगर यांच्या मार्फत गणवेश देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य साळुंखे बी.बी. यांनी केले. विविध स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी […]

पाककलेच्या मंचावर महिलांचा जलवा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद”

उरण, दि. २२ (विठ्ठल ममताबादे) :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी. खारपाटील हायस्कूल व कॉलेजमध्ये आयोजित “पाककला स्पर्धा २०२५” महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्साहात साजरी केली. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमास महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून […]

१५ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन.

उरण दि २०(विठ्ठल ममताबादे )मा. जिल्हाधिकारी हे पुनर्वसन फसवणूक व ठकवणूक आणि ग्रामपंचायत बंद करणे बाबत ठोस निर्णयासाठी बैठक घेत नसल्याचे निषेधार्थ तसेच हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे अनेक समस्या, प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२५ पासून जेएनपीएचे चॅनेल बेमुदत बंद करनार असल्याचे शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. शेवा कोळीवाडा […]

रुस्तमजी फाउंडेशनच्या मनमानी व हुकूमशाही कारभारा विरोधात  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ११ ऑगस्ट पासून आमरण उपोषण.

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा, या विद्यालयातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना आजतागायत सातवा वेतन आयोग नव्याने विदयालयाचा कार्यभार स्विकारणाऱ्या संस्थेने लागू केलेला नाही. परंतु सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे चालू असलेल्या वेतनामध्ये जुलै – २०१९ पासून वार्षिक वेतनवाढ आणि त्या अनुषंघाने राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता गेली सात वर्षे न […]

ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी जड वाहनांवर ड्रायव्हरसोबत क्लीनर (अटेंडंट) ची नेमणूक करण्याची मागणी.

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुका अपघात निवारण समिती (नि)ने आजपर्यंत अनेक समस्यावर आवाज उठविला आहे.रस्ते अपघात, वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आदींवर नियंत्रण, अद्ययावत रूग्णालय, अपघातग्रस्तांना मदत, पार्किंग झोन, मास्टर प्लॅन, पायाभूत सुविधा इ. मागण्यांसाठी तालुक्याची शिखर संघटना म्हणून उरण तालुका अपघात निवारण समिती उरण तालुक्यात कार्यरत आहे उरण मधील वाढते अपघाताचे प्रमाण, मृत्यूची वाढती […]

प्रा.अनुपमा कांबळे यांना पीएचडी प्रधान

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील  प्रा.अनुपमा राजकुमार कांबळे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा एक नवा शिखर गाठला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे त्यांना भूगोल विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील  ग्रामीण विकासावर दुग्ध व्यवसायाचा सामाजिक-आर्थिक परिणाम, पुणे (महाराष्ट्र) या विषयावर त्यांनी सखोल आणि […]

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र राज्याततील प्रत्येक समाजाचा सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करून मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे. मात्र लिंगायत समाजावर अन्याय करत महामंडळाचा लाभ घेण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्यात आला आहे.  इतर मागास बहुजन कल्याण विकास महामंडळ अंतर्गत जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) म्हणून स्थापन करण्यात आली […]

शेकापचे उरण विधानसभा अध्यक्ष मयुर सुतार यांचे व्ही के राज रेसिडेन्सी द्रोणागिरीच्या रहिवाश्यांनी मानले  आभार.

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )२०१२ साली ३४ ग्राहकांनी उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मध्ये साईनाथ डेव्हलोपर्स या बिल्डर कडे घर खरेदी करण्यासाठी बुकिंग केली होती.तब्ब्ल ३ कोटिहून अधिक रक्कम भरून ग्राहकांनी येथे रूम बुकिंग केले होते. पैसे सुद्धा ग्राहकांनी बिल्डरला अदा केले होते.परंतु साईनाथ डेव्हलोपर्स यांनी सर्वांची फसवणूक करत फरार झाला होता.त्यावेळी सर्व ग्राहक अडचणीत आले […]

चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया कोळी यांची बिनविरोध निवड

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या उपसरपंचपदी शिवसेना पक्षाच्या (उबाठा) सदस्या सुप्रिया कोळी यांची बिनविरोध निवड दिनांक १८ जुलै रोजी झाली.यावेळी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे, माजी सरपंच  मंगेश थळी, माजी उपसरपंच सोनाली ठाकूर, व्यंकटेश म्हात्रे, श्रीमती कल्पना पाटील, सदस्या मानसी पुरो,उज्वला म्हात्रे,पुष्पा म्हात्रे,प्रमिला म्हात्रे,जागृती कोळी ,  ग्रामपंचायत अधिकारी सुधीर […]

कामोठे परिसरात बनावट सरकारी कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट; पोलिसांनी दिला इशारा

कामोठे (4K News) – नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या काही बनावट व्यक्ती स्वतःला महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा रेशन दुकानदार असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे फसवे लोक विविध बहाण्यांनी नागरिकांना गोंधळात टाकून […]

Back To Top