मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले. पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले […]
कामोठे, सेक्टर 18 चा पेट्रोल पंप नागरिकांच्या सेवेत दाखल होणार – भाजप पदाधिकाऱ्यांची ग्वाही
कामोठे शहरातील नागरिकांना गेली तीन वर्षे प्रतीक्षा असलेला सेक्टर 18 येथील पेट्रोल पंप आता लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कामोठे :25 Sep (4K समाचार)आज कामोठे मंडळ भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पेट्रोल पंपाची पाहणी करून थेट मालकांशी संपर्क साधला. मंडळ अध्यक्ष विकास घरत व समाजसेवक रवी गोवारी यांनी पंप मालकांशी दूरध्वनीवर संवाद साधत अडचणी […]
दि.बा. पाटील यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाची मागणी..
पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेकडून सिडको व पोलिसांना निवेदन, २६ सप्टेंबरला धरणे आंदोलन.
पनवेल (4K News) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला काहीच दिवस शिल्लक असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या दैवत मानल्या जाणाऱ्या स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था रस्त्यावर उतरणार आहे. संस्थेच्यावतीने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि बेलापूर […]
महिलांच्या आत्मविश्वासासाठी कामोठ्यात नवा उपक्रम…
कामोठे (4K News) समाजात महिलांनीही आत्मविश्वासाने आणि सहजपणे इंग्रजीत संवाद साधावा, मुलाखतीत आपली छाप पाडावी आणि सार्वजनिक ठिकाणी निर्धास्तपणे बोलावे, या उद्देशाने सागरभाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कामोठ्यातील मुली आणि महिलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सद्वारे केवळ भाषा शिकवली जाणार नाही, तर आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि […]
सर्वपित्री अमावस्येला खड्ड्यांचे श्राद्ध – नागरिकांची अनोखी हाक!
कामोठे (4K News)परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सर्वत्र खड्ड्याच खड्डे असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिकेकडून केवळ एकच उत्तर मिळते – “पाऊस कमी झाल्यावर काम करू”… पण जोपर्यंत अपघात होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अलीकडेच […]
पुढील वर्षी होणार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाने दिली 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली: (4Kसमाचार)गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या मुदतवाढीच्या मागणीला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ओबीसी […]
भारत–पाक सामना – जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे
काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. भारतीय सेनेने धाडसी कारवाया करून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या जखमा आजही ताज्याच आहेत. शहिदांच्या बलिदानाची सावली अजूनही जनमानसावर आहे. अशा वेळी भारत–पाक क्रिकेट सामना खेळवण्यास परवानगी देणे हे भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे आहे. सरकारने […]
रस्ते, लाईट, आरोग्यसेवा – कामोठेकर त्रस्त, सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचा पालिकेला इशारा
पनवेल :सप्टेंबर 9 (4K समाचार)कामोठे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व सोयीसुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे आज पनवेल महानगरपालिकेत महत्त्वाचे मागणीपत्र सादर करण्यात आले. या मागणीपत्रात नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व सुविधा यांच्याशी संबंधित अनेक तातडीच्या विषयांचा समावेश आहे. 📌 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : कामोठे सेक्टर २१ येथील चौकाचे नामकरण “लोकनेते […]
समाजसेवेतील कार्याची दखल – शुभांगी खरात यांना अहिल्यारत्न पुरस्कार..
कराड (4K News)अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीमती शुभांगी सुरेशराव खरात (उद्योगिका, श्री साई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, कामोठे, मुंबई) यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी, […]
कामोठ्यात शेतकरी कामगार पक्ष व कॉलनी फोरम तर्फे खड्डे बुजविण्याचे अभियान
कामोठे (4K News) | कामोठे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी कामगार पक्ष आणि कामोठे कॉलनी फोरम तर्फे “खड्डे बुजविण्याचे अभियान” हाती घेण्यात आले. भर पावसात कार्यकर्त्यांचा पुढाकार आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी हातात […]
