दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हि आमची तळमळ – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे […]
लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांचा गौरव; चेअरमन परेश ठाकूर यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलमध्ये पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शाळेचे चेअरमन परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या तसेच सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी भाषण केले. त्यानंतर नर्सरी, ज्युनियर केजी व सीनियर केजीच्या विद्याध्यर्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर […]
आधारकार्ड शिबीर आणि आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीराचे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) नवीन पनवेल मध्ये आधारकार्ड शिबीर आणि आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीराचे 15 ते 22 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पार्टीच्या उत्तर […]
सापडलेले मंगळसूत्र चिमुकल्याने केले परत..!
पनवेल प्रतिनिधी :- रेल्वे पोलीस आयुक्तालयातील व पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी सोमनाथ इंगवले यांचा मुलगा नितेश सोमनाथ इंगवले हा कामोठे येथे क्लासला जात असताना सेक्टर ३४ कामोठे येथे त्याला एक पर्स मिळून आली त्या पर्समध्ये जवळपास अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र होते, हे सोन्याचे दागिने पहिल्या नंतर, नितेश याने या पर्सची […]
रुग्णसेवा हीच जनसेवा मानून केलेले सेवा हे पूर्णत्वास नेते – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल दि. १३ (संजय कदम) : मानवता सेवा ही महत्त्वाची आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून रुग्ण सेवा येथे चांगली मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचाराकरिता दाखल होत आहेत. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम […]
कामगार नेते संजय कलावती वासुदेव पवार यांना कोल्हापूर रत्न 2025 ने आले गौरविण्यात
पनवेल, दि.15 (संजय कदम) ः कामगार क्षेत्रात अल्पवधीत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कामगार नेते संजय कलावती वासुदेव पवार यांना नुकताच कोल्हापूर रत्न 2025 हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.संजय पवार यांनी मागील 25 वर्ष कामगार व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. विविध आंदोलने केली आहेत. तसेच माता भगिनींवर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला […]
अज्ञात कारणावरुन सहकार्याची केली आरोपीने 20 किलो वजन डोक्यात टाकून हत्या
पनवेल, दि.15 (संजय कदम) ः अज्ञात करणावरुन आपल्या सहकार्याच्या डोक्यात 20 किलो वजन टाकून त्याची हत्या केल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे. ताराचंद गुप्ता यांच्याकडे काम करणारा आरोपी धरम गोपाल राय (27 रा.उत्तरप्रदेश) याने त्याच दुकानात काम करणारा दुसरा कामगार अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू (29 रा.उत्तरप्रदेश) यांच्यात अज्ञात कारणावरुन आरोपी धरम राय याने अनिल […]
काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव ; करण्यात येत आहे कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. या भरावाच्या कामा दरम्यान नदीच्या पात्रातही भर टाकण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील गावामध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे तरी अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना […]
2030 पर्यंत 500 दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता – जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
जागतिक श्रवण दिनानिमित्त खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलने केली बहिरेपणा आणि कॉक्लियर इम्प्लांटसंबंधी जनजागृतीपनवेल, दि.7 (वार्ताहर) ः दरवर्षी जगभरात जागतिक श्रवण दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने मेडिकवर हॉस्पिटलने लहान मुलांमधील बहिरेपणा आणि कॉक्लियर इम्प्लांटवर जनजागृती करणार्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लहान मुलांमधील श्रवण क्षमता कमी होण्याच्या वाढत्या घटनांमुळे, या कार्यक्रमात श्रवण क्षमता कमी होण्याच्या घटना रोखण्यासाठी वेळेवर […]
विरुपाक्ष मंदिरातील कीर्तनसप्ताहाची सांगता
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः येथील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरामधे 24 वा नारदीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला. प्रारंभ झालेल्या या सप्ताहाची सांगता रसायनी येथील ह. भ. प. सच्चिदानंद महाराज कांबेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या सप्ताहामधे राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांनी आपली सेवा सादर केली. यावेळी कीर्तनसेवेसाठी हरिपाठ ही संकल्पना ठरविण्यात आली होती. त्याला अनुसरून कीर्तनकारानी हरिपाठातील अभंगांवर […]