नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

वृद्धाची फसवणूक करून २.५० लाखांची सोन्याची चैन लंपास

4k समाचार दि. 23 नवी मुंबई – पनवेल बस स्थानक परिसरात ६५ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून त्याच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची, अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  चंद्रशेखर सावंत यांनी कळंबोलीला जाण्यासाठी भाड्याने इको गाडी ठरवली होती. दरम्यान, गाडीचालकाने सावंत यांना चहातून गुंगीचे औषध देऊन त्यांची […]

नव्या जीएसटी दरांचा मद्यावर परिणाम नाही; मात्र पुढे दरवाढीची शक्यता

4k समाचार दि. 23 २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटी स्लॅबनुसार देशभरात आता फक्त ५% आणि १८% असे दोनच कर टप्पे राहणार आहेत. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी मद्यप्रेमींना कोणताही दिलासा मिळालेला नाही.  दारूवर अद्याप जीएसटी लागू नसून ती राज्य सरकारांच्या आबकारी कराखालीच येते. मात्र, सरकारने आणलेल्या ४०% विशेष करश्रेणीत तंबाखू, सिगारेटसह आलिशान […]

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; अनेक गावे जलमय, ५ जणांचा मृत्यू

4k समाचार दि. 23 मराठवाडा – रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत केले आहे. परंडा, पाटोदा, शिरूर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत असताना, काही ठिकाणी अतिवृष्टीचा तडाखा बसत […]

सोलापूर शरद पवारांना करमाळ्यात मोठा धक्का

4 k सामाचार दि. 23 सोलापूर – पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात जाण्याची घोषणा केली आहे.  सोमवारी शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावून पाटील यांनी यापुढील निवडणुका शिंदे गटासोबत लढवण्याचा निर्णय स्पष्ट केला. त्यांच्या या भूमिकेमुळे […]

मंत्र्यांच्या हस्ते मेट्रोची चाचणी प्रारंभ

नवी मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग ४ व ४अ च्या टप्पा-१ प्राधान्य विभागावर आज तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. एमएमआरडीएच्या वतीने या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तांत्रिक प्रणालींचे पुनरावलोकन केले जाणार आहे. […]

संन्यस्त खड्ग’ नाटकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा इशारा; पनवेलमध्ये प्रयोग थांबवण्याची मागणी

4k समाचार दि. 23 पनवेल/रायगड (प्रतिनिधी) – वि. दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या प्रयोगाविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेतली आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात हा प्रयोग होणार आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करीत या नाटकाला विरोध दर्शविण्यात आला आहे. […]

श्रमणसंघ जिवंत राहिला, तरच तो सदैव सशक्त राहील – युवाचार्य महेंद्र ऋषिजी

4k समाचार पनवेलमध्ये महाराष्ट्रातील ९० श्रीसंघांचा ऐतिहासिक व भव्य संमेलनपनवेल दि. 23 ( वार्ताहर ) : सप्टेंबर।श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, मुंबई–पुणे प्रांत, पंचम झोन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पनवेल व मेवाड़ श्रावक संघ यांच्या संयुक्त तत्वावधानात पनवेल येथील बँक्विट हॉलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील श्रीसंघांचे भव्य मिलन संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलन […]

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन

4k समाचार  दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) – शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहरातील डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.  या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, […]

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे गुरुवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण

4k समाचार दि. 23पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजता पनवेल येथील आद्य […]

गुळसुंदे येथे अभिनव सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सवाची उत्साहात सुरुवात

पनवेल (प्रतिनिधी) – गुळसुंदे येथील अभिनव सामाजिक विकास मंडळाच्या वतीने यंदाही नवरात्रौत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. सोमवारी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यानंतर मंगलमय वातावरणात देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली.  संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रद्धाळू भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित […]

Back To Top