राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे १२ वे पर्व; महाअंतिम फेरी पनवेलमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनिल बर्वे यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान
4k समाचार दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असून या महत्वपूर्ण वर्षानिमित्त यंदा दोन रंगकर्मीचा ‘गौरव […]
श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’
शनिवारी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांचे गायन
4k समाचार दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर योगीनगर (धोंडळी) परिसरात दरवर्षी प्रमाणे भक्तिभाव आणि अध्यात्मिक उत्साहात ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर (धोंडळी) यांच्यावतीने आयोजित हा उत्सव स्थानिक भक्तांसह संपूर्ण परिसरातील भाविकांसाठी अनन्यसाधारण आकर्षण ठरत आहे. […]
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
4k समाचार पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी झाल्याने आता पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंत सर्वजण देत आहेत . लग्नसराईत पूर्वीच्या काळी जेवणाची पंगत जमिनीवर त्यानंतर खुर्ची टेबलावर आता मात्र बदलत्या युगात त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे […]
जास्त व्याज दराने उच्च परतावाबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527/- रूपये लुबाडणाऱ्या गुन्हेगारास उत्तर प्रदेश येथुन अटक
पनवेल दि. २८ ( संजय कदम ): जास्त व्याज दराने उच्च परताव्याबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527/- रूपये लुबाडणाऱ्या एका गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नोएडा उत्तर प्रदेश येथुन अटक केली आहे . पनवेल शहरातील ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकांला आरोपी रविशंकर सुरेशप्रसाद मिश्रा उर्फ बी.एल. पटेल, वय ३० वर्षे, रा. रिवा, राज्य मध्य प्रदेश यांने आपण […]
खोपोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपा महायुतीची उत्साहपूर्ण प्रचारफेरी
4k समाचार दि. 28 खोपोली नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा महायुतीतर्फे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचंड उत्साहात पार पडलेल्या या प्रचारफेरीत कार्यकर्त्यांनी विजयी घोषणांनी आसमंत दुमदुमून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या जोशपूर्ण वातावरणाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रचारफेरीत भाजपाचे खोपोली निवडणूक निरीक्षक पनवेलचे माजी नगरसेवक तसेच भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस […]
देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेबानी दिले – आमदार प्रशांत ठाकूर
4k समाचार दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) भारताचे संविधान जगात अद्भुत आहे देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेबानी लिहिले त्यानंतर जगभरात या संविधानाचा गौरव केला जातोय .बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाबद्दल कृतज्ञता भावना केवळ दलित समाज करीत नसून सर्वच समाज करीत आहे .आज या संविधानाला ७५ वर्षे होत असून संविधानाच्या माध्यमातून देहशतील प्रत्येक […]
शालेय विद्यार्थीनीस शिक्षिकेकडुन मारहाण , शिवसेनेकडून आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणाची गंभीर दखल ,शाळा प्रशासनास जाब विचारत कार्यवाहीची मागणी !!
4k समाचार दि. 28 खारघर स्थित जिल्हा परीषद शाळेत २ दिवसांपूर्वी ६ वी च्या वर्गातील विद्यार्थीनी (वय ११ वर्ष )या मुलीस शाळेतील महीला शिक्षिका यांच्या कडून शिल्लक बाबी वरून गंभीर मारहाण करण्यात आली यामुळे या मुलीच्या अंगावर वळ उमटले ,पंरतु हे घरी सांगू नको याकरीता मुलीस शिक्षिकेकडुन दम सुद्धा देण्यात आला. सदर बाब मुलीचे […]
पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना करण्यात आले सन्मानित
4k समाचारपनवेल दि. २७ ( संजय कदम ) :पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालय नवीमुंबई यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे . नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पनवेल शहर पोलीस ठाण्याचे म सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे , पोहवा माधव शेवाळे , मपोशी साधना पवार , […]
ओरायन मॉल मध्ये असंभव चे विशेष प्रीमियर; शहरातील प्रतिष्ठित मंडळींची मोठी उपस्थिती
4k समाचार पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील एकमेव मॉल असलेल्या ओरायन मॉल मध्ये असंभव या मराठी चित्रपटाचे विशेष प्रीमियर मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी असंभव चित्रपटाची स्टारकास्टसह पनवेल शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.मराठी अभिनेत्यांना पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती. ओरायन मॉलचे मालक चित्रपटाचे सहनिर्माते मंगेश परुळेकर ,शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक संजय पोतदार […]
इसम बेपत्ता
4k समाचार पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) : राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता एक इसम कोठेतरी निघुन गेले ते अदयापपावेतो घरी परत आली नाही . म्हणून ते हरविल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . कैलास राजभर वय ४२ रा. देवीचा पाडा , हे असून त्यांचा रंग-सावळा, बाधा-सडपातळ, चेहरा-उभट, नाक-टोकदार, केस काळेलहान, […]
