आकाशाची राणी’ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर; पहिल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे आगमन
‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा
‘ 4kNews कामोठे दि. 27पनवेल (प्रतिनिधी ) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७ एफ मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय मालवाहतूक केंद्रावरून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान ठरले आहे. […]
३० ऑगस्टला पनवेलमध्ये माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे विशेष व्याख्यान
4kNews कामोठे दि. 27 पनवेल (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग, तालुका विधी सेवा समिती, पनवेल आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांचे विशेष व्याख्यान व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आद्य क्रांतिवीर […]
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना पनवेलतर्फे मोफत बस सेवा
4kNews कामोठे पनवेल, दि.२६ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने तसेच शिवसेना नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पनवेलच्या वतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ सप्टेंबर रोजी पनवेलहून कोकणातील विविध ठिकाणी या बस रवाना होणार आहेत. यामध्ये राजापूर (पाली, लांजा मार्गे), रत्नागिरी (संगमेश्वर), चिपळूण, खेड आणि दापोली […]
रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे महिलांचा मंगळागौर सोहळा उत्साहात
4kNews कामोठे पनवेल, दि.२६ (वार्ताहर) : रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करंजाडे येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला मंगळागौर सोहळा उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. महिलांनी पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कलाविष्कार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या तयारीसाठी महिलांनी सुमारे महिनाभर नियमित सराव केला होता. त्यांच्या मेहनतीचे आणि उत्स्फूर्त सहभागाचे रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानचे सरचिटणीस […]
श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियांका वैभव मालुसरे प्रथम
4kNews कामोठे पनवेल, दि. २६ (वार्ताहर) : साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कुरूप यांच्या पुढाकाराने पनवेल येथील चंदूकाका सराफ येथे ‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना, आत्मविश्वासाला आणि व्यक्तिमत्त्वाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेत रियांका वैभव मालुसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘श्रावण क्वीन २०२६’चा मान […]
जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर; पूजा म्हात्रे राज्य कर निरीक्षकपदी
4kNews कामोठे धाकटा खांदा गावच्या लेकीची प्रशासकीय सेवेत झेप; सतीश पाटील यांनी घरी जाऊन केले अभिनंदनपनवेल | प्रतिनिधी : संजय कदम धाकटा खांदा गावातील पूजा बाळकृष्ण म्हात्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत राज्य कर निरीक्षक पदावर निवड मिळवली आहे. ग्रामीण भागातील मुलीने स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवल्याने परिसरातून त्यांच्यावर […]
अदानी इलेक्ट्रिसिटीतील अधिकाऱ्यांच्या कथित हकालपट्टीविरोधात मुख्यमंत्र्यांकडे धाव
‘म्युच्युअल सेपरेशन’ऐवजी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याची मागणी
4kNews कामोठे दि. 26मुंबई (प्रतिनिधी) : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडमधील अधिकाऱ्यांवर ‘म्युच्युअल सेपरेशन’च्या नावाखाली दबाव आणून सेवेतून कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही अधिकारी १० वर्षांपासून तर काही ३८ वर्षांपासून वीज वितरण क्षेत्रात […]
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
4kNews कामोठे 26 पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपच्या अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आल्याने पनवेलसह रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या […]
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
4kNews कामोठे 26 पनवेल (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या हस्ते कदम यांचा गौरव करण्यात आला. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने मुंबई […]
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे )नवीन शेवा व शेवा कोळीवाडा या दोन्ही विस्थापित गावांच्या प्रलंबित प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्रालय, मुंबई येथे रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेऊन ग्रामसुधारणा मंडळाच्या वतीने दोन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. माजी आमदार मनोहरशेठ भोईर व चंद्रकांत घरत […]
