नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 2038 पर्यंत सुरूच राहणार : शंतनू गोयल
पनवेल :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक श्री. शंतनू गोयल यांनी 4K न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाचे काम उद्घाटनानंतरही पुढील अनेक वर्षे सुरू राहणार आहे. त्यांनी सांगितले की, दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले तरी विमानतळाच्या संपूर्ण प्रकल्पाला पूर्णत्व यायला अजून वेळ लागणार आहे. कारण या विमानतळावर २ धावपट्ट्या (Runways), ४ टर्मिनल्स (Terminals) व […]
कामोठ्यात अतिक्रमणाविरोधात कारवाई : ११ हातगाड्या जप्त व अनेक गाड्या JCB द्वारे तोडण्यात आल्या
कामोठे:(4KNews)पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती – कामोठे अंतर्गत वाढत्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागल्याबाबत वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींना अनुसरून, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी अतिक्रमण पथकाने मोठी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान कामोठे परिसरातील एकूण ११ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर या गाड्या JCB द्वारे तोडण्यात आल्या, अशी माहिती प्रशासनाने दिली. […]
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव मिळणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेला ठोस आश्वासन
पुणे (4K News)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असून प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा केंद्र सरकार आदर करेल, असे ठोस आश्वासन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी पुणे येथील सरितानगरी येथे आयोजित जनता दरबारात ना. मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी […]
गुन्हे शाखा, कक्ष ३ पनवेल यांनी हरवलेले २५ लाख रुपये किमतीचे १२२ मोबाईल फोन नागरीकांना केले परत
4k समाचार दि. पनवेल दि.२६ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे प्रवासादरम्यान, खरेदीच्या वेळी व इतर कारणास्तव त्यांचेकडील वापरते मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत विविध पोलीस ठाण्यांकडे प्रॉपर्टी मिसिंग तक्रार दाखल होत आहेत. अशा गहाळ झालेल्या मोबाईल फोनमध्ये फोन धारकाचे, नातेवाईक, मित्र व परिचित इसमांचे संपर्क […]
शुक्रवार पनवेलमध्ये सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण
4k समाचार दि. 26पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजता पनवेल येथील आद्य […]
सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन-कला संघटनेचा स्तुत्य उपक्रम
4k समाचार दि. 25 जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि कला संघटन यांच्या संयुक्त उपक्रमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने संजय देशमुख, आयकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय कराधान) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘ स्पर्धा परीक्षा ही सुवर्णसंधी आहेच […]
उलवे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
4k समाचार दि. 25 पनवेल (प्रतिनिधी) पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडवली आणि त्यांचा आदर्श घेऊन घडलेल्या वासरदारांनी ही संस्था मोठी केली असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी उलवे येथे कार्यक्रमात केले तसेच येत्या काळामध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल हे नवी […]
पाणीपट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू करा – माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी
4k समाचार दि. 25पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत (अभय योजना) लागू करून १०० टक्के शास्ती माफ करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली […]
एकात्ममानववादाचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय यांना पनवेल भाजपकडून अभिवादन
4k समाचार दि. 25 एकात्मता, मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रप्रेमी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. त्यांना जयंतीनिमित्त भाजपचे […]
दिवाळी अंकामुळे दिवाळी सण ज्ञानाचा उत्सव
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष सदानंद मोरे
4k समाचार दि. 25 पनवेल (हरेश साठे) मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके व आनंदसोहळ्यापुरती मर्यादित नसून, दिवाळी अंकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी सण दिवाळी अंकाच्या अनुषंगाने ज्ञानाची सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे […]