नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
Open Channels FM: Software Lock-In and AI Tools for Modern Web Businesses
How to Get a 90+ PageSpeed Score in WordPress for Free (Measured)
Open Channels FM: How AI Agents Target Open Source and Why Storage Is the New AI Bottleneck
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 

ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर!!

4k समाचारउरण दि २7 (विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला.अजित ठाकूर हे कॉंग्रेस पक्षाचे  तडफदार युवा नेते आहेत. […]

शेकाप कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नियुक्ती

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. अमोल शितोळे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना कामोठे विभाग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप […]

शेकापच्या पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम यांची नियुक्ती

4k समाचार पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली.दिलीप कदम यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना पनवेल महानगरपालिका शहराध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप […]

नवसपूर्ती झाल्याने अ‍ॅड.कोमल मोहनीश भोईर यांनी दिली गणपती बाप्पाची मुर्ती भेट

4k समाचार पनवेल, दि.27 (संजय कदम) ः केलेला नवस पूर्ण झाल्याने त्याची उतराई म्हणून अ‍ॅड.कोमल मोहनीश भोईर आणि उद्योजक मोहनीश अनंत भोईर यांनी शिवनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणपती बाप्पाची मुर्तीची भेट देवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवस फेडला आहे. शिवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंधेरी (प.) येथील गणरायाकडे भोईर कुटुंबियांनी नवस बोलला होता. त्या नवसाची पूर्तता झाल्याने […]

नवी मुंबईत मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे उघडकीस

4k समाचार नवी मुंबईतील मतदारयादीवर मोठा विसंवाद उघडकीस आला आहे. तब्बल ७६ हजार दुबार नावे या यादीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१,५५६ तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात सुमारे ३५,००० अशी मोठी संख्या आहे.  या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून ही सर्व […]

घरफोडी चोरी करणा-या पती-पत्नी आरोपींना अटक

4k समाचार  उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )दिनांक ०८/०८/२०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता ते सायंकाळी ०४:०० वा. चे दरम्यान फिर्यादी राजु गुरूनाथ झुगरे वय ४४ वर्षे, रा. दादरपाडा, ता. उरण, जि. रायगड हे त्यांचे घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून घरामधील बेडरूमचे वॉर्डरूममध्ये ठेवलेले १३,७१,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे […]

फडणवीसांना धक्का; भाजप पदाधिकारी सुश्मिता भोसले ठाकरेंच्या सेनेत

4k समाचारनवी मुंबई दि. २६ (प्रतिनिधी) :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या पदाधिकारी सुश्मिता भोसले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) प्रवेश केला आहे.  भोसले यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गट आणखी बळकट झाला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित […]

कान्हादेश (खान्देश )मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे  मेळावा उत्साहात संपन्न.

4k समाचार उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याचा भाग खान्देश म्हणून ओळखला जातो. खान्देश हा महाराष्ट्राचा अविभाज्य व महत्त्वाचा भाग आहे आज खान्देशातील नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र व महाराष्ट्र बाहेर तसेच देश विदेशात नोकरी व्यवसाय धंद्या निमित्त मोठया प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. देशाच्या विकासात आजपर्यंत खान्देश मधील नागरिकांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. […]

पनवेलमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय व रोटरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

4k समाचार  उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )राजयोगिनी प्रकाशमणी दादीजींच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच विश्वबंधुत्व दिनाच्या पावन प्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, समाजसेवा विभाग – पनवेल व रोटरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी हुतात्मा स्मारक उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित […]

हायड्रो टेस्टिंग दरवाढीवरून रिक्षा संघटनांचा संताप; आंदोलनाचा इशारा

4k समाचार दि. 25   पुणे  सीएनजी वाहनधारकांवर वाढीव हायड्रो टेस्टिंग दरांचा मोठा आर्थिक बोजा पडला असून, यामुळे रिक्षाचालक आणि खासगी वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पूर्वी 500 ते 700 रुपयांमध्ये होणारी तपासणी आता तब्बल 2,800 ते 3,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. प्रत्येक तीन वर्षांनी ही तपासणी बंधनकारक असल्याने दरवाढ परवडणे कठीण ठरत आहे. यामुळे रिक्षा […]

Back To Top