नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Tag: #Kamothe #

४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात

4kNews कामोठे पनवेल, दि. 25(प्रतिनिधी) : सोन्याच्या सहा लगडींचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आरोपीकडून ६६६.२३ ग्रॅम वजनाचे, सुमारे ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले. पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधील कामगार शुभम मनाजी खिलारे याच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सहा सोन्याच्या […]

कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

4kNews कामोठे पनवेल, दि. 25 (प्रतिनिधी) : कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. करंजाडे परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कथित कॉल सेंटरवर छापा टाकून चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या […]

जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा

4kNews कामोठे पनवेल, दि. २५ (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कथित विलंब आणि कागदपत्रांच्या मागणीवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका दप्तरी जन्म-मृत्यूची नोंद असतानाही दुय्यम प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही काही अर्जदारांना अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. […]

स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार

4kNews कामोठे दि. 25पनवेल : संस्कार प्रतिष्ठान अंतर्गत अॅड. सौ. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) संचालित स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात पार पडला. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी ठाणा नाका रोड येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला गुरुवर्या सौ. देवताताई प्रसाद सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेविका डॉ. […]

सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

4kNews कामोठे नवी मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : नवी मुंबई गुन्हे शाखा (कक्ष-१, वाशी) पथकाने सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करून ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून सहा सोन्याच्या चेन आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. खारघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज […]

चंदेरी किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या तीन तरुणांची सुखरूप सुटका

4kNews कामोठे दि. 25 पनवेल : चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तीन तरुणांचा डोंगरात रस्ता चुकल्याने ते भरकटले. मदतीसाठी त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून तिघांनाही सुखरूप गडाच्या पायथ्याशी आणले.  वावंजे बिट निर्भया एमडीटीवर सकाळी ११.०८ वाजता चंदेरी किल्ल्यावर काही जण अडकल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) […]

खारघर हिल मॅरेथॉनला ९ हजार धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे पनवेल, दि. २५ (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेतर्फे आयोजित ४२ किलोमीटर अंतराच्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ९ हजार धावपटूंनी विविध गटांत सहभाग घेत खारघरच्या टेकड्यांवर उत्साहाचे वातावरण निर्माण केले.  पहाटे ४.३० वाजता महापौर नितीन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश […]

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

4kNews कामोठे पनवेल, दि. २३ (वार्ताहर) : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६’मध्ये पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या सन्मानाबद्दल आमदार विक्रांत पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.  पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संजय कदम […]

चोरीचा टेम्पो सापडला; संशयित ताब्यात
पळस्पे महामार्ग पोलिसांची तत्पर कारवाई

4kNews कामोठे पनवेल, दि. 25 (वार्ताहर) : जनरेटरसह चोरीला गेलेला टाटा ४०७ टेम्पो अवघ्या काही तासांत शोधून काढत एका संशयिताला ताब्यात घेण्यात पळस्पे महामार्ग पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक केदार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली. अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन कुमार कागले यांनी पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राला चोरीच्या टेम्पोची माहिती दिली. […]

पनवेलमध्ये १५० वाहनचालकांची आरोग्य तपासणी

4kNews कामोठे दि. 25 पनवेल : पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संस्था आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, सिव्हिल हॉस्पिटल रायगड, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूल बस, व्हॅन चालक, सहकारी तसेच इतर वाहनचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी साईनगर रोड येथील श्री गणेश साई मंदिरात झालेल्या या शिबिराला वाहनचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद […]

Back To Top