पनवेल, दि. 6(संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना बढती मिळून ते पोलीस निरीक्षकपदी नियुक्त झाले असून त्यांना नवी मुंबई विमानतळ (इमिग्रेशन) या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना आज बढती मिळून पोलीस निरीक्षक […]
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %
4kNews कामोठे पनवेल ,दि. 6( वार्ताहर ) : कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दोन्ही शाळांचा १२ वी चा निकाल १०० % लागला आहे . कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दि इलाईटपब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व बीके पाटील ज्युनिअर कॉलेज (बबन दादा पाटील ज्युनिअर कॉलेजचा) शिक्षण 2025 – 26 […]
बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह
पनवेल ,दि. 6( वार्ताहर ) : तालुक्यातील बंबई पाडा परिसरात रविवारी सकाळी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणावरून महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंबई पाडा येथील रहिवाशांना सकाळच्या सुमारास संबंधित महिला घरात मृतावस्थेत आढळून आली. […]
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न
4k कामोठे पनवेल दि.०6 (वार्ताहर) : महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुकापूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हळदीकुंकू समारंभासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपनेते बाळ माने, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण […]
सायबर जागरूकतेसह हळदी-कुंकू समारंभः कमळ महिला पतसंस्थाः परंपरा आणि जागरूकतेचा सुंदर संगम
4kNews कामोठे पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था (म.) पनवेल ही संस्था महिलांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. यावर्षीही चैत्रगौरी निमित्त हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पतसंस्थेच्या कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, पहिला मजला, जयभारत नाका, पनवेल येथे पार पडला.समारंभाच्या सुरुवातीला संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. पूर्वा खेडेकर यांनी उपस्थित महिला सभासदांचे […]
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
4kNews कामोठे पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा प्रदेश दौरा सुरू आहे. त्यांच्या उपस्थितीत काल आणि आज उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले. आज सकाळी त्यांनी युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, युवा […]
पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे; नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांची आयुक्तांना निवेदन
4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर): पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक ॲड मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे पावसाळ्यापूर्वी करण्याची कामे आपले पत्र देऊन मागणी केली आहे;. यामध्ये त्यांनी अय्यप्पा मंदिर ते देवद कडे जाणाऱ्या नवीन रस्त्यावर […]
रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारणे व पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करा – नगरसेविका ऍड शिवानी घरत
4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर) : नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात पोलीस चौकी उभारणे व महापालिकेच्या माध्यमातून पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करावी अशी मागणी नगरसेविका ऍड शिवानी घरत यांनी पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते विशेषतः रात्रीच्या […]
रायगड राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांची बदली करा; रायगड वासीयांची मागणी
4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर): प्रशासकिय कामात दिंरगाई चालढकल पणा लोकप्रतिनिधी व वरीष्ठांच्याच नव्हे तर चक्क मंञीमहोदयांच्या आदेशा कडेही कानाडोळा करून फार कामात मग्न असल्याचा आव आणुन निर्जन्य ठिकाणी सुरू असलेले धोकादायक गावठी दारू अड्यांकडे अधिक्षक माञ दुर्लक्ष करीत असल्याने रायगड वासीयांत अधिक्षक यांच्या बदलीचा जोर धरू लागला आहे. रायगड जिल्हयात निर्जन व डोंगर जंगल […]
*रेल्वे अपघातात दोन्ही पाय हिरावले, पण जिद्दीने मातृत्व जिंकले*
4kNews दि. 23 *खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दिला 3.2 किलोच्या वजनाच्या निरोगी बाळाला जन्म* नवी मुंबई :* अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुतीच्या अशी गर्भधारणा असलेल्या तसेच रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या एका डॉक्टर महिलेने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये 3.2 किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. प्रगत वैद्यकीय उपचार आणि तज्ज्ञांच्या टीमवर्कमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.धाडस आणि अत्याधुनिक […]
