ढोल-ताशा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात
सार्वजनिक मंडळांचीही सजावटीसाठी जोरदार तयारी
4k समाचारपनवेल दि. २१ ( संजय कदम ) : गणेशोत्सवाचे आगमन आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे पनवेल परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल , नवीन पनवेल , करंजाडे , कामोठे , खांदा वसाहत या भागांतील विविध गणेशोत्सव मंडळे तयारीला लागली आहेत. तर दुसरीकडे गणेशाचे आगमन व विसर्जन करतेवेळी गणेशभक्तांना तालात […]
सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात ; २.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
4k समाचार पनवेल दि. २१ ( संजय कदम ) : रबाळेपोलिसांनी सोनसाखळी खेचणाऱ्या एका सराईत चोरट्याला कोपरखैरणे परिसरातून अटक केली आहे. रोहित शिवाजी गायकवाड (२४) असे त्याचे नाव असून, त्याने घणसोली परिसरात केलेल्या सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांतील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे […]
कळंबोलीत खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचा अपघात; शिवसेना कार्यकर्ते मदतीला धावले
4k समाचार पनवेल | कळंबोली सर्कल ते टी पॉईंट दरम्यान रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अवघ्या एका तासात तब्बल ७ ते ८ दुचाकीस्वार कुटुंबासह कोसळले. या अपघातांमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे शिवसैनिक तत्काळ मदतीला धावून गेले. कामोठे शहर संघटक संतोष गोळे, उप शहर प्रमुख गणेश खांडगे, सचिन […]
भीषण अपघात : अचानक थांबलेल्या बसला कारची धडक, ८ जखमी
4k समाचार दि. 21 नवी मुंबई | एक्सप्रेस हायवेवर आज सकाळी झालेल्या अपघातात तब्बल आठ जण जखमी झाले. धोकादायक पद्धतीने बस उभी करून प्रवाशांना उतरवत असताना मागून आलेल्या कारने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात दावला हडवळे गंभीर जखमी झाले असून इतर सात जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींमध्ये विमल हडवळे (५७), अशोक हडवळे (३७), […]
राज ठाकरे – फडणवीसांची 50 मिनिटांची बैठक; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
4k समाचार मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ही बैठक तब्बल 50 मिनिटे चालली. बैठकीत राज्यातील नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत असली तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे काही वेळातच पत्रकार परिषद घेणार असल्याने त्यांच्या […]
नवी मुंबईत पाणी साचण्यावर आयुक्तांच्या दाव्यांची पोलखोल
4k समाचार दि. 21 नवी मुबंई शहरात पाणी साचलेले नाही, असा दावा आयुक्तांनी केला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अनरजित चौहान यांनी या दाव्याची पोलखोल केली आहे. चौहान यांनी सांगितले की, नाल्यांमधील उंचीतील फरक आणि नाल्यांच्या मार्गात बांधलेल्या झोपड्यांमुळे पाणी साचत आहे. विशेषतः वाशी सेक्टर २९ आणि तुर्भे एपीएमसी मार्केट परिसरातील नाल्यांजवळ उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई न […]
अल्पवयीन मुलाला कामाला ठेवले: मालकावर गुन्हा दाखल
4k समाचार दि. 21पनवेल शहरातील सावित्री पेट्रोल पंपावर अल्पवयीन मुलाला हवा भरण्यासाठी ठेवल्याप्रकरणी मालक मंजयकुमार राय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान निरीक्षक गजानन जोंधळे यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. १३ वर्षीय मुलाने स्वतःचे वय सांगितल्यानंतर चौकशी केली असता, मालकाकडे मुलाच्या वयाबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सज्जता; गरजेच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दलाची पथके त्वरित पाठवण्याच्या सूचना
4k समाचार दि. 21 मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. पूरस्थिती नियंत्रण, नागरिकांची […]
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येला १२ वर्षे; न्यायासाठी लढा सुरूच
4k समाचार दि. 21 पुणे | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज १२ वर्षे पूर्ण झाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील न्यायालयीन लढ्याला आजही पूर्णविराम मिळालेला नाही. न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची […]
महाराष्ट्रात 15,631 पोलीस भरतीची मोठी घोषणा
4k सामाचार दि. 21 मुंबई | राज्यात तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 15,631 पोलीस भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या शासननिर्णयानुसार, पोलीस शिपाई 12,399, चालक 234, बॅण्डस्मन 25, सशस्त्र शिपाई 2,393 आणि कारागृह शिपाई 580 पदे भरण्यात येणार आहेत.ही भरती 2024-25 दरम्यान […]
