दिल्ली पब्लिक स्कूल, पनवेल चा वार्षिक स्नेहसंमेलचा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न.
पनवेल ता.19(बातमीदार) : दिल्ली पब्लिक स्कूल, पनवेल चा दिमाखदार वार्षिक स्नेहसंमेलन दिवस ता.17 रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा हा शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि कठोर परिश्रमांचा भव्य उत्सव होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणूनरायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत, अनुज अग्रवाल व्हाईस चेयरमन डीपीएस, शाळेच्या प्राचार्या साक्षी […]
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे इर्शाळ वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना 10 सायकली भेट
पनवेल, दि.17 (संजय कदम) ः विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्या रोटी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे नुकत्याच मोठ्या दुर्घटनेतून सावरलेल्या इर्शाळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना 10 अत्याधुनिक सायकली भेट स्वरुपात देण्यात आल्या. मा.प्रांतपाल डिस्ट्रीक्ट 3131 डॉ.गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरीचे प्रेसिडंट रोटरीयन शैलेश पोटे, सेक्रेटरी रोटरीयन दिपक गडगे, ट्रेझरर रोटरीयन ॠषिकेश बुवा व सर्व्हीस प्रोजेक्ट […]
पर्ण सन्मान पुरस्कार म्हणजे साहित्य संस्कृती आणि वास्तवाचे दर्शन- डॉ किरण कुलकर्णी
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः वसुंधरा फाउंडेशनच्या पर्ण दिवाळी अंकाच्या वतीने देण्यात येणारा पर्ण सन्मान पुरस्कार 2024 साहित्यिक आणि भाषा विभागाच्या उपसंचालक अंजली ढमाळ यांना ज्येष्ठ साहित्यिक आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या हस्ते आणि जेएनपीटी महाप्रबंधक (विपणन) अंबिका सिंह, ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला .पनवेल येथे […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण
पनवेल (4kNews) सामाजिक क्षेत्रात हिरीरीने अग्रस्थानी असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणजे पनवेल तालुका पत्रकार विकास मंच. संस्थेच्या प्रथेनुसार नूतन कार्यकारिणीने आज (दि. १६) शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रे प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकारांचा सहभाग असलेली पनवेल तालुका […]
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
पनवेल(4kNews) खांदा कॉलनी येथील सिकेटी कॉलेज अर्थात चांगु काना ठाकूर महाविद्यालयामध्ये सन २००४ च्या बॅचच्या कला शाखेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ रमेश यादव व सहकारी यांनी एकत्र येऊन यावेळी जुन्या आठवणी जागृत केल्या. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला शिक्षणाचा आधार असतो आणि तोच आधार योग्यवेळी […]
यंदाही भव्य स्वरूपात ‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन; मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक
पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील स्पर्धेप्रमाणे यंदाही भव्य स्वरूपात विविध क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव अर्थात […]
परप्रांतीयांची फुटपाथ वरील अतिक्रमणे प्राधान्याने मोकळी करा – शिवसेनेची मागणी
पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अतिक्रमणांवर जोरदार हातोडा सुरू आहे. अनधिकृत बिना परवाना धारक अतिक्रमण आठवडे बाजार या सर्वांवर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई व जप्तीची कारवाई चालू आहे. परंतु हे होत असताना महापालिका क्षेत्रातील कामोठा- खारघर – नवीन पनवेल खांदा कॉलनी व सर्वच परिसरात खाद्यपदार्थ व स्वीट्सची मोठी – मोठी परप्रांतीयांची दुकाने ज्यांनी फुटपाथ गिळंकृत करत […]
इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे.
इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे. १३ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान ही स्पर्धा इटलीतील मोलवेनो शहरात होणार असून उरण मधील प्रभात कोळी हा या स्पर्धेत देशाचे प्रतिनीधीत्व करणार आहे. याबद्दल त्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आज (दि. ३१) सदिच्छा भेट घेऊन आर्शिवाद घेतले. यावेळी लोकनेते […]
कामोठे मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा २४ तासाचे आत उघड; २ आरोपींना पोलिसांनी केली अटक
पनवेल दि.०२(kNews): कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासात तपास करून आरोपींना अटक केली आहे. कामोठे येथील ड्रीम्स सोसायटी फ्लॅट नं. १०४ से. ६, ता. पनवेल येथे गॅस लीक होवुन गॅसचा वास येत आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर ठिकाणी कामोठे पोलीस […]
शौकीन पान शॉप आणि जनरल स्टोअर्समध्ये चोरी
पनवेल, दि.28 (4kNews) ः पनवेल शहरातील परदेशी आळी येथे असणार्या शौकीन पान शॉप आणि जनरल स्टोअर्समध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे सदर पान शॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश आतील दुकानातील रोख रक्कमेसह इतर साहित्य मिळून असा जवळपास 40 हजाराच्या आसपास मुद्देमाल चोरुन नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक […]
