4kNews कामोठे उरण, दि. ९ (विठ्ठल ममताबादे) : “महेंद्रशेठ घरत हे मनाने सच्चे आणि आश्वासक नेतृत्व आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल. त्यांना योग्य संधी देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. उरण तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ८) […]
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
4kNews कामोठे उरण, दि. 9(विठ्ठल ममताबादे) : ‘नाते मातीशी’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून खान्देश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने आयोजित ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. करंजा रोड येथील भारती बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खान्देशी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवात सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, सामूहिक भोजन तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. खान्देशातून सेवामुक्त […]
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
4kNews कामोठे उरण, दि. 9(विठ्ठल ममताबादे) : विंधणे कोळीवाडा येथे ‘एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित, विंधणे’ या संस्थेचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. ६) कुलदैवत मंदिरासमोरील पटांगणात उत्साहात पार पडला. स्थानिक पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात […]
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
4kNews कामोठे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी संवेदनशील भागांत ‘एरिया डॉमिनेशन’पनवेल, दि. 9 (वार्ताहर) : आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पनवेल शहर पोलिस व राज्य राखीव दलाच्या (RAF) जवानांनी विविध संवेदनशील भागांत रूट मार्च व ‘एरिया डॉमिनेशन’ केले. पनवेल शहर पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला मार्च ५२ बंगला, साईनगर, बंदर रोड, […]
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
4kNews कामोठे दि. 9कामोठे : ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात नवी मुंबईचा ‘आगमनाधीश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामोठ्याच्या विघ्नहर्ताचे भव्य महाआगमन उत्साहात पार पडले. अटल सेतूवरून कामोठ्याच्या दिशेने निघालेल्या मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सहभागी झाले. कामोठ्याचा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ढोल-ताशा व लेझीम पथकांसह पारंपरिक वेशभूषा आणि विविध आकर्षक […]
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
4kNews कामोठे पनवेल, दि. 9(वार्ताहर) : माँसाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका प्रगती कैलास पाटील यांच्या पुढाकाराने तळोजा येथे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांना सहज मिळावा, तसेच डिजिटल आरोग्य नोंदणीला चालना मिळावी, या उद्देशाने शिबिर घेण्यात […]
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
4kNews कामोठे अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; तातडीने व्यवस्था सुधारण्याची मागणीपनवेल, दि. ९ (वार्ताहर) : कळंबोली परिसरातील अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, याप्रश्नी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिडको प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून […]
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन
4kNews कामोठे दि. 6पनवेल (प्रतिनिधी) : देशसेवेची जाणीव आणि बंधुभाव जपत इनर व्हील क्लब ऑफ पनवेल, डिस्ट्रिक्ट ३१३च्या सदस्यांनी लडाखमधील सीमेवर तैनात जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले. कडाक्याची थंडी, रणरणते ऊन आणि अनिश्चित हवामानात देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना सणाचा आनंद मिळावा, या उद्देशाने पीपी सुनीता जोशी, क्लब एडिटर शिल्पा चंदने आणि सदस्य वंदना बडगुजर या […]
धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात रात्रभर नामस्मरण, भजनाने भक्तिमय वातावरण; अनेक वर्षांची परंपरा कायम
4kNews कामोठे उरण, दि. 6(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील धुतुम गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. धुतुम खालची आळीच्या वतीने शंकर मंदिरात पूजा, अभिषेक व धार्मिक विधी पार पडले. सामाजिक कार्यकर्ते समाधान कृष्णा कटेकर व भारती समाधान कटेकर यांच्या हस्ते सप्ताहाचा अभिषेक व पूजाविधी करण्यात आला. गावात सुख, शांती […]
नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी रेवणसिद्ध ठेंगले
4kNews कामोठे दि. 6 पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्यांमध्ये नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी रेवणसिद्ध ठेंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर ठेंगले यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा रोडवरील हॉटेल चालक तसेच सीएफएस कंटेनर […]
