नवीन बातम्या
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

उरणमध्ये बिबट्याची दहशत; पावलांचे ठसे व बकऱ्यांवर हल्ला

4kNews दि. 10 उरण तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींची चाहूल लागली आहे. पाणदिवे, कोप्रोली डोंगरातील निळी खान तसेच छोटे धरण परिसरात बिबट्याचे स्पष्ट पावलांचे ठसे आढळून आले असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.उत्तम म्हात्रे यांच्या तीन बकऱ्यांना बिबट्याने ठार केल्याची घटना घडली असून, हा हल्ला रात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. […]

मिरची गल्ली मध्ये अर्थवट बांधकाम स्थितीत असलेल्या इमारतीला लागली आग

4kNewsपनवेल दि.१०(वार्ताहर): पनवेल शहरातील मिरची गल्ली येथील एका अर्थवट बांधकाम स्थितीत असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना आज घडली आहे.   शहरातील मिरची गल्लीच्या प्रवेशद्वाराजवळील आर्किड क्लिनिकच्या बाजूला असलेल्या अर्थवट बांधकाम स्थितीतील इमारतीमध्ये आज दुपारी अचानकपणे आग लागून येथे असलेल्या गवताने व प्लस्टिकने पेट घेतला. याबाबत परिसरातील जागृत नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित येथे जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न […]

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्वाचा जल्लोष; कोपरा, मुर्बी व खारघर येथील उत्कृष्ट २४ विद्यार्थ्यांचा गौरव

4kNews दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळांच्या आंतरशालेय पारितोषिक वितरण सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा, मुर्बी आणि खारघर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या जोमाने सहभाग घेतला. विविध फेऱ्यांमध्ये प्रभावी कामगिरी […]

रायगड भाजपा सांस्कृतिक सेलतर्फे ‘बिग बॉस १९’ तृतीय विजेता व सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेची भेट

4kNews दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) रायगड भाजपा सांस्कृतिक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदी बिग बॉस सिझन १९ मध्ये तृतीय क्रमांक पटकावणारे आणि पनवेल–खारघरचा गौरव वाढविणारे सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांची सदिच्छा भेट घेतली.  या भेटीदरम्यान सेलच्या वतीने प्रणित मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. बिग बॉसच्या व्यासपीठावर आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने आणि विनोद शैलीने संपूर्ण देशाचे लक्ष […]

वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात पनवेल शहर पोलिसांची कारवाई

4kNewsपनवेल दि. १० ( संजय कदम ): शहरातील वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात आज पनवेल  शहर पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे .   वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात  अनेक तरुण दुचाकी ,चार चाकी वाहने घेऊन हुल्लडबाजी करित असतात . याचा नाहक त्रास या भागातील शालेय विद्यार्थांसह परिसरातील […]

आईच्या किडनीमुळे मुलाला नवजीवन

4kNews दि. 10 महाड, l:मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला त्याच्या आईने किडनी दान करून नवजीवन दिले आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल नवी मुंबई येथे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. रुग्णाला अॅटिपिकल हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम (Atypical HUS) हा दुर्मिळ आजार झाला होता. डॉ. अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रगत उपचारांच्या मदतीने रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आले. […]

PMAY घरांच्या अवास्तव दरांवर आमदार विक्रांत पाटील आक्रमक —

4kNews  दि. 10 नवी मुंबई/पनवेल – सर्वसामान्य मराठी कुटुंबांना परवडणाऱ्या घरांचा हक्क मिळावा यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात CIDCO विरुद्ध जोरदार निदर्शने करत PMAY घरांच्या अवास्तव दरांचा मुद्दा सरकारसमोर ठामपणे मांडला.“परवडणारे घर हे स्वप्न नसून हक्क आहे. CIDCO च्या प्रचंड किंमतींमुळे EWS आणि LIG कुटुंबांवर अन्याय होत आहे.” असे आमदार पाटील यांनी विधानभवनाच्या […]

सुलोचना संतोष भगत  यांना मातृशोक

4kNews दि. 10 पनवेल/प्रतिनिधी: पनवेलमधून प्रकाशित होणार्‍या रायगड पनवेलच्या मालक, मुद्रक, प्रकाशक सुलोचना भगत यांच्या मातोश्री साखरीबाइ कृष्णा पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 82 वर्षांच्या होत्या.  घणसोली गावातील भजनीबुवा रमेश कृष्णा पाटील यांच्या त्या मातोश्री होत. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्या परिचित होत्या. त्यांच्यापश्‍चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे […]

पनवेलच्या बाजारपेठा नाताळ निमित्त सजल्या

4kNews पनवेल दि.10 (वार्ताहर):  नाताळ हा सर्ण सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषकरून बच्चे कंपनीमध्ये या सणाचे विशेष आकर्षण असते. अवघ्या काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असल्याने पनवेल परिसरातील विविध ठिकाणच्या बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी सजल्या आहेत. ख्रिसमसनिमित्त होणाऱ्या सेलीब्रेशनची आतापासूनच जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे.  नाताळ जवळ आल्याने शहरांतील बाजारपेठा, दुकाने […]

तरुण बेपत्ता

4kNewsपनवेल दि. 10 (वार्ताहर): करंजाडे येथील राहत्या घरातून एक तरुण कोणास काही एक न सांगता निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.    प्रणित प्रदिप शिंदे (वय- २५ वर्षे, रा. अनंत सोसायटी, सेक्टर- आर ४, करंजाडे) असून त्याची उंची ८ इंच अंदाजे, बांधा मध्यम, रंग-248 सावळा, चेहरा-गोल, केस-काळे जाड वाढलेले […]

Back To Top